Type Here to Get Search Results !

परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्यावर जबाबदारी:बेकायदा वाहतुकीवर परिवहनमंत्री अवाक; 50 हजार अवैध स्कूल बसेसवर कारवाई करा

राज्यभरात २०११ च्या स्कूल बसच्या धोरणाप्रमाणे स्कूल बसेस चालवण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र बेकायदा पद्धतीने स्कूल बसेस, टॅक्सी, इकोमधून सर्रास विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे राज्यात तब्बल ५० हजारांपेक्षा अनेक स्कूल व्हॅन बेकायदा विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. त्यांच्यावर कारवाई कधी असा प्रश्न अनिल गर्ग यांनी उपस्थित केल्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक अवाक होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहतूक काही केली जाते का? असे म्हणत ६ जूनपर्यंत बेकायदा सर्व वाहनांवर कारवाईचे आदेश दिले. जी वाहने नियमात बसतील त्यांना नियमात कसे बसवायचे यासंदर्भातील जबाबदारी सहपरिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. स्कूल बस आणि त्यासाठीच्या सुरक्षा आणि शुल्कवाढ आदी अनेक प्रश्नांच्या संदर्भात गुरुवारी परिवहनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. त्रुटी दूर करू : भीमनवार देशामध्ये स्कूल बस धोरण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या धोरणातील त्रुटी दूर केल्या जातील. तसेच यात सुधारणाही केल्या जातील. गुरुवारी झालेल्या बैठकीत स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांनी मांडलेल्या सूचनांचा धोरणातील नियम सुधारणावेळी विचार केला जाईल, असे परिवहन आयुक्त भीमनवार म्हणाले. दरम्यान, याबाबत उपाययोजनेचेही निर्देश दिले आहेत. कोणावरही अन्याय नाही : सरनाईक स्कूल बस वाहतूक नियमावलीत सुधारणा करताना कोणावर अन्याय होणार नाही, पण नियमही शिथिल होणार नाहीत, स्कूल बस वाहतूक क्षेत्राशी आपण अनेक वर्षे जोडलो आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अडचणी माहिती आहेत. नियमाचे पालन न करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही. परिवहन विभागानेही अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4RmCSbk

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.