अनैतिक संबंधाच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याची घटना शहरातील गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाभा येथे घडली. या घटनेबाबत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी प्रियकराला अटक केली आहे. अक्षय प्रभाकरराव दाते (२६, रा. हजारीपहाड) असे आरोपीचे नाव आहे, तर हेमलता किशोर वैद्य असे मृत प्रेयसीचे नाव आहे. नागपुरात अभिषेक ठाकुरदास केवलरामानी हे बिल्डर असून त्यांची गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकांशी सोसायटी येथे पिस रेसिडेन्सी नावाने फ्लॅट स्कीम आहे. केवलरामानी यांनी सहा महिन्यांपूर्वी हेमलता यांना तिथे रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी दिली. दाभ्यातील अपार्टमेंटच्या तळमजल्यावरच केवलरामानी यांचे कार्यालय आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही पळून नागपुरात आले. ते लग्न करणार होते. हेमलताचे इतर तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची कुणकुण अक्षयला लागली. एकदा ती एका तरुणासोबत बोलत असल्याचेही अक्षयने बघितले. त्यामुळे त्याचा संशय बळावला. गुरुवारी सायंकाळी त्याने लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर वार केला. रक्ताच्या थारोळ्यात हेमलता खाली कोसळताच अक्षय पसार झाला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/dUw63zP
दोघेही घरातून पळून आले होते;सहा महिन्यांपूर्वी प्रेयसी लागली होती नोकरीला:प्रेमासाठी घर सोडले; संशयातून प्रियकराकडून प्रेयसीचा खून, नागपूरची घटना
May 08, 2025
0