Type Here to Get Search Results !

दिव्य मराठी विशेष:नाशिकच्या चिंचवडला मँगो बँक, 45 जातींची झाडे; इस्रायली पद्धतीने लागवड, वर्षभरात आणखी 100 जाती लावणार

जगात आंब्यांच्या सुमारे दीड हजाराहून अधिक जाती असून त्या एकाच ठिकाणी पाहण्यास आणि अभ्यासासाठी मिळाव्यात यासाठी आदिवासी तरुणांच्या पुढाकाराने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे मँगो बँक साकारली जात आहे. आतापर्यंत या बँकेत आंब्याच्या ४५ हून अधिक जातींची एकत्रित लागवड येथे करण्यात आली असून वर्षभरात आणखी १०० जातींची लागवड करण्यात येणार आहे. इस्रायली पद्धतीने फळबाग फुलवण्याच्या तंत्रज्ञानाचा यासाठी वापर करण्यात आला आहे. तसेच पुढील काही वर्षांत एकूण पाच एकर क्षेत्रावर देश-विदेशातील आणखी काही जातींची लागवड येथे करण्यात येणार असल्याचे युवा शेतकरी जनार्दन वाघेरे यांनी सांगितले. वाघेरे यांनी २०१० मध्येच इस्रायली तंत्रज्ञानानुसार आपल्या एक एकर क्षेत्रात हजार आंब्यांची लागवड करून विक्रमी उत्पादन घेत त्यातील काही माल निर्यात देखील केला. जंगलातील तसेच परदेशातील काही आंब्यांचे त्यांनी कलम तयार करुन नव्या जाती विकसित केल्या आहेत. आपल्या प्रकल्पासाटी शासनाकडून साहाय्य मिळवण्यासाठी वाघेरे व भोये यांचे प्रयत्न सुरू आहेत. जंगलात सापडल्या आंब्याच्या विविध जाती राज्यात केवळ ५ ते ६ पद्धतीच्या आंब्यांचे उत्पादन घेतले जाते. मात्र जंगलात गेल्यानंतर विविध प्रकारच्या आंब्याच्या जाती पाहण्यास मिळाल्या. त्या संकलित केल्या. या सर्व जाती एकाच ठिकाणी लागवड करून एक मँगो बँक साकारण्याचा प्रयत्न सुरु आहे. - जनार्दन वाघेरे, आंबा उत्पादक गुजरात, राजस्थानातून बाग पाहण्यासाठी शेतकरी दिवाळीमध्ये उर्वरित जातींची झाडे लावण्याची प्रक्रिया होईल. सध्या आमच्याकडे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून शेतकरी बाग पाहण्यासाठी येत आहेत. - मनोहर भोये, आंबा उत्पादक बँकेतील प्रत्येक आंब्याची चव न्यारी हे विशेष सध्या या मँगो बँकेत वनलक्ष्मी, सुंदरी, माया, अॅस्टीन, चौसा, कोकण सम्राट, राजापुरी, मल्लिका, कोकण राजा, वनराज, दूधपेढा, सुंदर, दामोदर, सोनपरी, चंद्रमा, सुवर्णा रेखा, रत्ना, बजरंग अशा ४५ हून अधिक जातींची यशस्वी लागवड केली आहे.तसेच यामध्ये कोकणचा राजा हा ७०० ग्रँम वजनाचा होतो, तर सोनपरी ६०० ग्रँम वजनाचा एक आंबा तयार होत आहे. विशेषत: या आंब्यांत प्रत्येक आंब्याची वेगवेगळी चव आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/pKj0YZq

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.