देशाच्या बहुतांश भागात नोव्हेंबरमध्ये सरासरीच्या अधिकचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे, तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने यंदा कडाक्याच्या थंडीचे आगमन उशिरा होणार आहे. हवामान विभागाने देशाचा नोव्हेंबर महिन्याचा हवामान अंदाज शुक्रवारी दिला. यानुसार हिमालयीन राज्ये , अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू राज्यात पाऊस कमी असेल, तर महाराष्ट्र-गोव्यासह अनेक राज्यांत पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. नोव्हेंबरमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. उद्या मराठवाड्यात पाऊस प्रशांत महासागरातील ला निनामुळे तीव्र थंडीची अपेक्षा आहे. दरम्यान, द. भारतातील राज्यात ईशान्य मोसमी पाऊस दमदार राहील. अरबी समुद्रातील दाबाचे क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात कायम असून यामुळे गुजरातमध्ये पाऊस होईल. महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होणार आहे. रविवारी मराठवाड्यात काही भागात पाऊस होऊ शकतो.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/3yRTleh
नोव्हेंबरातही पावसाचे मळभ, थंडीचे उशिरा आगमन होणार:कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार
October 31, 2025
0