Type Here to Get Search Results !

मत चोरीच्या विरोधकांचा मुंबईत सत्याचा मोर्चा:तर प्रत्युत्तरात्मक भाजपचे मूक आंदोलन, परवानगी न घेतल्यामुळे कारवाईची शक्यता

मतदार यादीतील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात आज (1 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सत्याचा मोर्चा काढला होता. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. मात्र, या दोन्ही आंदोलनासंदर्भात एक मोठी कायदेशीर अडचण समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या 'सत्याच्या मोर्चा'तील आयोजकांवर तसेच भाजपने केलेल्या 'मूक आंदोलना'तील आयोजकांवरही आता गुन्हा दाखल होणार आहे. आज मुंबईत सर्व प्रमुख विरोधी पक्ष (राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात) आणि सत्ताधारी भाजप (भाजपने केलेले मूक आंदोलन) यांनी आपापले राजकीय शक्तीप्रदर्शन केले. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही आंदोलनांसाठी मुंबई पोलिसांकडून योग्य ती कायदेशीर परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे मतचोरीच्या विरोधात 'सत्याचा मोर्चा' काढणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर भाजपने विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या 'मूक आंदोलना'च्या आयोजकांवरही परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मोर्चाचे आयोजक असलेल्या आघाडीतील काही प्रमुख नेत्यांवर पोलिस कारवाई होण्याची शक्यता आहे. हे गुन्हे आझाद मैदान पोलीस ठाणे आणि डी बी मार्ग पोलीस ठाण्यांतर्गत (झोन 2) दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एल्गार आणि प्रत्युत्तराला कायदेशीर आव्हान मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाला आव्हान दिले होते. तर भाजपने लगेचच मूक आंदोलन करून विरोधकांच्या मोर्चाला प्रत्युत्तर दिले. मात्र, आता या दोन्ही राजकीय एल्गारांना कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंकडून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत जमल्याने शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत कोणतीही अनुचित घटना घडू दिली नाही. तथापि, आता या मोर्चा आणि आंदोलनाच्या परवानगीविना आयोजनामुळे विरोधकांसोबतच भाजपलाही कायदेशीर अडचणीत यावे लागू शकते, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आता या दोन्ही बाजूचे आयोजक आणि नेते या कायदेशीर कारवाईवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा... सत्याचा मोर्चा:आपला पक्ष, नाव आणि निशाणी चोरली गेली, आता मतचोरी सुरू; आता या ॲनाकोंडाला कोंडावंच लागेल - उद्धव ठाकरे मतदार याद्यांमधील गंभीर घोळ, मतचोरी आणि दुबार नावांवरून उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ऐतिहासिक सत्याचा मोर्चा निघाला. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा काढला. सत्याचा मोर्चा, या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनातून मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात आवाज उठवण्यात आला. सविस्तर वाचा...

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KmPLhFr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.