Type Here to Get Search Results !

अंजनगाव-अकोट मार्गावर अपघात: ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून एकाचा मृत्यू:लखाडजवळ उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, एक गंभीर जखमी

अंजनगाव-अकोट महामार्गावर लखाड गावाजवळ एका दुचाकीने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. मृताचे नाव लक्ष्मण हिरे असे आहे, तर त्यांचे भाऊ ज्ञानदेव हिरे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही अंजनगाव येथून त्यांच्या मूळ गावी लखाडकडे दुचाकीने जात होते. लखाड गावाजवळ रस्त्याच्या कडेला एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह उभा होता. सायंकाळच्या अंधारात हा ट्रॅक्टर स्पष्टपणे दिसला नाही, त्यामुळे लक्ष्मण हिरे यांच्या दुचाकीची त्याला धडक बसली. अपघातात लक्ष्मण हिरे दुचाकीवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानदेव हिरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतकाचे चिरंजीव अशोक लक्ष्मण हिरे यांच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टरमालक अमोल वानखडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता (भादंवि) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलिस करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/CErTZlS

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.