Type Here to Get Search Results !

संभाजीनगर परिसरातमादी बिबट्याचा वावर:शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, थाेडक्यात बचावला

तांदुळवाडी मांडवा (ता. गंगापूर) परिसरात शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने बिबट्या पळाला. वाळूज गावाजवळील तांदुळवाडी मांडवा येथील शिंदे वस्ती भागातील संदीप पुरुषोत्तम विधाते (३८) हे शुक्रवारी शेतात पाणी देण्यासाठी गेले असता बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली. बिबट्याची झडप हुकल्याने विधातेंना पळ काढता आला. या परिसरात गेल्या २ महिन्यांपासून मादी बिबट्या आणि तिच्या दोन बछड्यांचा वावर आहे. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने २ महिन्यांत दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. मांडवा गावात काळे वस्ती परिसरात २ महिन्यांपूर्वी प्रशांत इंगळे व सुदाम घाटे हे दुचाकीवरून जात असताना बिबट्याने त्यांचा पाठलाग केला होता. बिबट्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी प्रशांत इंगळे, रमेश बारे व ग्रामस्थांनी केली. पालघरला बिबट्याशी दप्तराची ढाल करून लढला ११ वर्षीय मयंक मुंबई | बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र, ११ वर्षीय मयंकसाठी शाळेचे दप्तरच ढाल बनले. त्याने दप्तराने बिबट्याचा प्रतिकार केला, तर त्याच्या मित्रानेही धैर्याने बिबट्यावर दगडांचा मारा केला. त्यामुळे दप्तराचे ‘ओझे’ अर्थात मार बिबट्याला सहन झाला नाही आणि त्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा किरकोळ जखमी झाला. पालघर जिल्हयातील विक्रमगड तालुक्यातील माळा पाडवीपाडा येथील ११ वर्षीय मयंक विष्णु कुवरा हा गावापासून ४ किमीवरील उटावली आदर्श विद्यालयात पाचवी इयत्तेत शिकतो. शाळेचा रस्ता जंगलाचा आहे. शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर तो आणि त्याचा मित्र पाडवीपाडा येथे पायी जात असताना अचानक बिबट्याने मयंकवर झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्याने मयंकने जिवाच्या अंकाताने आरडाओरड सुरू केली. बिबट्याच्या पंजाचा पहिला वार दप्तरावर झाल्याने मयंकला सावरण्यास वेळ मिळाला. त्याने दप्तराने बिबट्याचा प्रतिकार सुरू केला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रानेही हिंमतीने बिबट्यावर दगड भिरकावले. दोन्ही मुलांचा आवाज ऐकून काही नागरिक धावत आले. त्यामुळे बिबट्या क्षणार्धात जंगलात पसार झाला. बिबट्याची झडप थेट त्याच्या दप्तरावर बसल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. मात्र पंजांचे दुसरे वार हातावर बसल्याने मयंकच्या हाताला खोल जखमा झाल्या. त्यावर टाके घातले. जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मुलांच्या धाडसाचे कौतुक दोन चिमुरड्यांच्या धाडसी प्रतिकारामुळे मोठी दुर्घटना टळली. मयंकचे शाळेचे दप्तरच त्याच्यासाठी ‘कवच’ ठरले. सध्या राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून अनेक ठिकाणी मृत्यूच्या व जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत दोन मुलांनी दाखवलेल्या शौर्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. शाळांच्या वेळा बदलण्यासाठी पत्रव्यवहार कांचदचे वनक्षेत्रपाल स्वप्निल मोहिते यांनी सांगितले की, गावकऱ्यांना सावध करण्यासाठी लाऊड स्पीकरद्वारे आवाहन केले जात आहे. तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी AI सक्षम कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. बिबट्या-प्रवण भागातील शाळा संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवाव्यात, या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/B85EqJd

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.