Type Here to Get Search Results !

सांगलीत भांड्याच्या दुकानाला आग;आजी-आजाेबा, मुलगी अन् नात ठार:शाॅर्टसर्किटने आग; घरातून बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही

जिल्ह्यातील विटा येथील सावरकरनगरमध्ये एक भांड्याच्या दुकानाला शाॅर्टसर्किटमुळे अाग लागली. ही अाग वरच्या मजल्यावरील दुकानमालकाच्या घरापर्यंत पोहोचली. या भीषण अागीत दुकानमालक, त्याची पत्नी, मुलगी आणि नात असा ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. विट्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांच्या स्वतःच्या तीनमजली इमारतीत जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे. पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे, तर उर्वरित इमारतीत जोशी यांचे कुटुंब राहते. दरम्यान, सकाळी जय हनुमान स्टील सेंटर दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला. घरातून बाहेर पडण्यासाठी या भीषण आगीत दुकानमालक विष्णू पांडुरंग जोशी (४७), त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी (४२), मुलगी प्रियंका योगेश इंगळे (२५) आणि विष्णू जोशी यांची नात सृष्टी योगेश इंगळे (२) या चौघांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील ५ जण अडकले होते. त्यापैकी सुरेश जोशी हे गंभीर भाजले. घरातून बाहेर पडण्यासाठी एक छाेटासा दरवाजा होता, परंतु अागीचे लोळ आणि धुरामुळे कुणालाही बाहेर पडता आले नाही. तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण केले. सुरुवातीला कमी वाटणाऱ्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. घरे चिकटून असल्याने आग विझविण्यात अडथळे आजूबाजूला घरे एकमेकांना चिटकून असल्याने ही आग विझविण्यासाठी आणि मदतकार्यात अडथळे येत होते. दहा वाजेच्या सुमारास कडेगाव नगरपंचायतचा अग्निशमन बंब, कुंडल कारखान्याचे अग्निशमन बंब, उदगिरी कारखान्याचे अग्निशमन बंब, पलुस नगरपालिकेचा अग्निशमन बंब, तासगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब असे एकूण सहा अग्निशमन बंब आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचे प्रयत्न करत होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/N7ymuJQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.