भरधाव कार दुभाजकाला धडकून कारला अाग लागल्याने यात कारमधील २१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर पती जखमी झाला. जळगाव- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाकोद गावाजवळ ही घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. जान्हवी संग्राम माेरे (२१) असे मृत महिलेचे नाव अाहे. पती संग्राम जालमसिंग मोरे (२६) हे जखमी झाले. बोहार्डी (ता. भुसावळ) येथील दिवाळीसाठी माहेरी अालेल्या जान्हवी मोरे या आईवडिलांना भेटून छत्रपती संभाजीनगर येथे पतीसोबत कार (क्र. एम.एच. २० जी.व्ही. २१२५) ने जात असतांना पहुर -वाकोद रस्त्यावर वाकोदहुन २ किमीटर अंतरावर वाहतूक पोलिसांची तपासणी सुरु होती. यावेळी समोरून चालणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने कार चालवत असलेले संग्राम यांनी कार सावरण्याचा प्रयत्न केला परंतु कार भरधाव वेगात असल्याने नियंत्रण झाले नाही. ही कार वेगाने दुभाजकाला जोरात धडकली. यावेळी कार मधून एकच भडका उडाला. यावेळी प्रत्यक्षदर्शी पोलिस व नागरिकांनी घाव घेत चालक संग्रामला बाहेर काढले. परंतु कार लॉक झाल्याने पत्नी जानव्हीला बाहेर काढण्यासाठी कारच्या काचा ही फोडल्या. मात्र कारला माेठ्या प्रमाणात अाग लागल्याने प्रयत्न अयशस्वी झाले. जखमी पतीला पहुरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. राहुल निकम यांनी प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात रवाना केले. यावेळी कारने मोठा पेट घेतल्याने शेंदुर्नी नगरपंचायतीचे टंॅकर बोलवण्यात आले. बंब आल्यावर कार विझवण्यात आली. यानंतर जान्हवीचा मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविछेदनासाठी पाठवण्यात अाला.या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. महिलेच्या जिवाच्या आकांताने किंकाळ्या जान्हवी वाचवण्यासाठी किंकाळ्या मारत होती परंतु कार लाॅक झाल्याने प्रत्यक्षदर्शी काहीच करू शकत नव्हते. काही वेळातच संपूर्ण गाडी अागीत भस्मसात झाली. यात जान्हवीचा मृत्यू झाला. दिवाळसणासाठी ती माहेरी आली होती. मृत जान्हवी यांचे आई-वडील शेतकरी आहेत. कुटुंबातील तीन अपत्यांपैकी ती मोठी होती. तिला एक लहान बहिण व भाऊ आहे. संभाजीनगरात मेडिकलचे दुकान संग्राम मोरे हे कुलमखेडा ( ता. जि. बुलढाणा ) येथील मूळ रहिवाशी आहेत. त्यांचे संभाजीनगर येथे मेडिकल दुकान असून तेथेच वास्तव्यास आहेत. तर पत्नी तीन महिन्यांची गर्भवती हाेती. माहेरून छत्रपती संभाजीनगर येथे जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक बापू रोहम यांनी पहूर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन नातेवाइकांची विचारपूस केली. व घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश सहा. पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना दिले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Wl98Nv4
जळगाव-संभाजीनगर महामार्गावर दुभाजकाला धडकून कारला लागलेल्या आगीत माहेरवाशीण महिलेचा मृत्यू:पहूरजवळ अपघात, पती गंभीर जखमी,कुटुंबाचे संभाजीनगरात मेडिकल दुकान
November 10, 2025
0