खेळाचे साहित्य आहे, पण मूल त्यात रमत नाही. मैदानी खेळांची जागा मोबाइल गेम्स, रील्सने घेतली आहे. याचा परिणाम मुलांच्या बालपणावर होतोय. बालपण हरवू नये, मैदानी खेळांची माहिती होण्याबरोबरच तणावमुक्त जीवन जगता यावे यासाठी पायोनियर्स सेकंडरी शाळेसह बालविकास विद्यामंिदरमध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास “शनिवार एक तास पॉज’ उपक्रम सुरू केला आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो आहे.आठवडाभर शाळेतील अभ्यास, गृहपाठ नंतर खासगी क्लास यात एका मशीनप्रमाणे विद्यार्थी जुंपले जात आहेत. वर्षभरापूर्वी मॅडमकडे काही तरी वेगळं शिकवा म्हणून विद्यार्थ्यांनी हट्ट केला. त्यातूनच तणाव मुक्तीसाठी एक दिवस एक तास पॉज हवा. म्हणून “शनिवार पॉज तास’ हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे शिक्षिका आशा मालटे यांनी सांगितले. यात शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आट्या पाट्या, धप्पा कुटी, लिंगोरचा, आंधळी कोशिंबर, आपडी थापडी असे खेळ शनिवारी रंगतात. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजन आणि तणावमुक्तीसाठी मदत होते. विद्यार्थ्यांचा स्वविकास अभ्यासक्रमात स्वविकास आणि विद्यार्थ्यांसोबत होत असलेल्या चर्चेतून तणावमुक्त कसे ठेवता येईल. यासाठी उपक्रम राबविला जातो. ज्यात जुने पारंपरिक खेळ विद्यार्थी खेळतात. यातूनही त्यांना अभ्यासातील गोष्टी शिकविल्या जातात. -आशा माल्टे, शिक्षिका शालेय विद्यार्थी खेळाने तणाव विसरले मी दहावीत आहे. बऱ्याच वेळा अभ्यासाचा ताण पडतो. भीती वाटते. या तणावातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना पॉज हवा. तो शनिवारच्या उपक्रमामुळे मिळतोय. ताण कमी होतो. आम्ही कधी शिवणकाम, विणकाम करतो, सारिपाट खेळतो. आमचे छंद या उपक्रमातील कलाकुसरीने जपतो. -संस्कृती शहरवाले, विद्यार्थिनी
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Uyq9uzw
विद्यार्थ्यांच्या तणावमुक्तीसाठी ‘शनिवार 1 तास पॉज’ उपक्रमातून दिसला बदल:कलाकुसरीचा आनंद; नो मोबाइल गेम, नाे रिल्स
December 07, 2025
0