Type Here to Get Search Results !

रोहयोच्या कामांसाठी मजुरांचा ‎एकच फोटो; 5 कोटी हडपले‎:फुलंब्रीत 7 रोजगार सेवकांची सेवा समाप्त; 11 जणांना नोटीस‎

फुलंब्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत‎३३ गावांतील ९६ कामांसाठी चक्क मजुरांचे‎एकच सामूहिक छायाचित्र वापरल्याचा ‎‎धक्कादायक प्रकार समोर आला आहे.‎त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ‎‎अधिकारी, प्रशासक अंकित यांनी ७ रोजगार ‎‎सेवकांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले आहेत. ‎‎त्याचबरोबर २ सहायक कार्यक्रम अधिकारी,‎७ अभियंता आणि २ संगणक ऑपरेटर अशा‎११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस‎बजावली आहे. या कामांमध्ये ५ कोटी १८ ‎‎लाखांची बिले उचलण्यात आली आहेत.‎ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मातोश्री‎पाणंद रस्ते योजनेच्या कामातील‎गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली‎आहे. फुलंब्री तालुक्यातील ३३ गावांतील ९६‎कामांसाठी मजुरांचा एकच सामूहिक फोटो,‎महिला मजुरांच्या जागेवर पुरुषांचे, तर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पुरुषांच्या जागेवर महिलांचे फोटो अपलोड‎करून ५ कोटी १८ लाख रुपयांची बिले‎उचलल्याचा प्रकार ६ व ७ जुलै रोजी‎उघडकीस आला होता. याची दखल घेऊन‎राज्याचे रोहयो आयुक्त, जिल्हाधिकारी आणि‎जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत‎चौकशीचे आदेश दिले.‎ प्रकरणाची दोन वेळा चौकशी‎ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‎अंकित यांनी ७ जुलै रोजी यासाठी चौकशी‎समिती स्थापन केली हाेती. समितीने दिलेला‎पहिला अहवाल अपूर्ण असल्याने दुसऱ्यांदा‎चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.‎त्यानुसार दुसऱ्यांदा संबंधित समितीने अहवाल‎दिल्यानंतर सीईओ अंकित यांनी गटविकास‎अधिकाऱ्यांना संबंधित ग्रामपंचायतींमध्ये‎ग्रामसभा घेऊन ७ रोजगार सेवकांची सेवा‎समाप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.‎

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hONRl1I

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.