Type Here to Get Search Results !

संभाजीनगरसह बारा मनपांना सरकारकडून 74 कोटींचा निधी:नागरी सोयी-सुविधांचा विकास गतिमान करण्यावर भर

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्य सरकारने “विकासा’च्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. नगरविकास विभागाने शनिवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील छत्रपती संभाजीनगरसह १२ प्रमुख महानगरपालिका आणि नगरपालिकांना विविध विकासकामांसाठी एकूण ७४ कोटी ६४ लाखांचा निधी वितरित केला आहे. राजकीय वर्तुळात या निधीवाटपाकडे थेट निवडणुका स्पेशल बूस्टर म्हणून पाहिले जात आहे. राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत नागरी सोयी-सुविधांचा विकास गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विविध महानगरपालिका क्षेत्रांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, गटार, ड्रेनेज व अन्य मूलभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे. “टार्गेट’ महापालिका आणि वितरित निधी १ कोकण विभाग : मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर, मीराभाइंदर, वसई-विरार या महापालिकांना १७२ कोटी मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ४३ कोटींचा सर्वाधिक निधी वितरित करण्यात येणार आहे. २ पुणे विभाग : पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर सोलापूरसाठी ९० कोटी मंजूर करण्यात आले असून २२ कोटी ५० लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ३ छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड-वाघाळा या महापालिकांसाठी १३.६५ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी ३ कोटी ४१ लाख निधी वितरित दिला. ४ नाशिक विभाग : नाशिक, धुळे महापालिकांसाठी १३० कोटी मंजूर करण्यात आले असून ३ कोटी २५ लाख वितरित करण्यास मंजुरी. राज्यातील मतदारांवर डोळा आचारसंहितेपूर्वी तातडीने रस्ते, पाणी आदी विकासकामांसाठी निधी देऊन मतदारांना आकर्षित करण्याची मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेले प्रकल्प आता तातडीने पूर्ण करून मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच स्थानिक नेत्यांनाही यातून खुश करण्याचे काम असल्याचे सांगण्यात येत आहे. पकड मजबूत करण्यावर भर महत्त्वाच्या मनपांवर लक्ष केंद्रित करून विकास प्रकल्पांची गती वाढवण्याचा प्रयत्न आहे. नाशिकसह खान्देश, मराठवाडा व विदर्भातील शहरांतील विकासकामांना हातभार लावून सत्ताधाऱ्यांकडून राजकीय पकड मजबूत करण्याची रणनीती आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/rPJ5uOi

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.