Type Here to Get Search Results !

मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!:तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार, पक्षात नाराज असल्याची होती चर्चा

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. उत्तर मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या घोसाळकर घराण्यातील महत्त्वाच्या सदस्या, दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर या उद्या, सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दादर येथील भाजपचे कार्यालय 'वसंत स्मृती' येथे सकाळी 10 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर अधिकृतपणे भाजपचे कमळ हाती घेतील. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आणि कट्टर शिवसैनिक कुटुंबातील सदस्या भाजपमध्ये जात असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्यातच नुकतीच भाजपची सत्ता असलेल्या मुंबई बँकेवर त्यांची संचालक म्हणून निवड झाली होती. या निवडीनंतरच त्या भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळाले होते, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 20 डिसेंबरला उर्वरित मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. यानंतर लगेचच जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि बहुप्रलंबित महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेले हे पक्षांतराचे सत्र ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. 'सन्मान मिळाला तरच युती'; 50-50 च्या फॉर्म्युल्यावर प्रताप सरनाईक ठाम मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, महायुतीमधील जागावाटपावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला महायुती हवीच आहे, पण ती सन्मानपूर्वकच व्हायला हवी. भाजपला जितक्या जागा, तितक्याच जागा शिवसेनेलाही मिळाल्या पाहिजेत, असा '50-50' चा रोखठोक फॉर्म्युला राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे. वाचा सविस्तर

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7VQIzpe

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.