Type Here to Get Search Results !

व्यूहरचना:‘वंचित’ला ‘मविआ’सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव, घटक पक्षांशी लवकरच चर्चा

महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपचा सामना करण्यासाठी आता महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र लढण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. त्याचबरोबर मविआमध्ये वंचित बहुजन आघाडीलाही सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, पक्षाचे निरीक्षक माजी आमदार वजाहत मिर्झा यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची चर्चा सुरू होती. मात्र, काँग्रेसने आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षांनाही सोबत घेण्याचा प्रस्ताव काँग्रेसने मांडला आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एका खासगी हॉटेलमध्ये सुमारे अडीच तास बैठक झाली. काँग्रेसतर्फे उद्धवसेनेशी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्याची टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये शहराध्यक्ष राहिलेले माजी आमदार नामदेव पवार, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, विलास औताडे, प्रकाश मुगदिया यांचा समावेश आहे. आघाडीत काँग्रेसला किती जागा मिळू शकतात, याबाबतही हे पदाधिकारी चर्चा करणार आहेत. दरम्यान, ‘वंचित’सोबत जितेंद्र देहाडे, अशोक डोळस, इब्राहिम पठाण, मोईन इनामदार, कमाल फारुकी, सय्यद अक्रम हे चर्चा करणार आहे. मतांत फूट पडू नये वंचित बहुजन आघाडी, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना आघाडी करण्यासाठी काँग्रेसचा प्रस्ताव देणार आहोत. धर्मनिरपेक्ष मतांत फूट पडू नये, हा पक्षाचा उद्देश आहे. त्यामुळे काँग्रेसची टीम त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. - कल्याण काळे, खासदार प्रस्ताव आल्यास चर्चा काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. काँग्रेसने आघाडीबाबत प्रस्ताव दिल्यानंतर चर्चा करण्यात येईल. - अंबादास दानवे, उद्धवसेनेचे नेते

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/sxhGHiL

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.