Type Here to Get Search Results !

कल्याण-डोंबिवलीत भाजपने विजयाचे खाते उघडले:रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित, विरोधात एकही अर्ज नाही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपने विजयाचे खाते उघडत मोठी बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक 18 (अ) मधून भाजपच्या उमेदवार रेखा राजन चौधरी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला असून, या विजयामुळे भाजप गोटात उत्साहाचे वातावरण आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षित जागेसाठी विहित मुदतीत केवळ रेखा चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला असून, इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने येथून अर्ज भरलेला नाही. परिणामी, या प्रभागात निवडणूक न होताच भाजपने आपला पहिला विजय नोंदवला असून, अधिकृत घोषणेनंतर रेखा चौधरी या महापालिकेच्या पहिल्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका ठरतील. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच भाजपने विजयाचा श्रीगणेशा केला असून, प्रभाग क्रमांक 18 (अ) मधून भाजपचे खाते उघडले आहे. या प्रभागातील 'नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला' या राखीव जागेसाठी विहित मुदतीत केवळ रेखा राजन चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याची अधिकृत माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड आता निश्चित झाली असून, निकालाआधीच मिळालेल्या या मोठ्या यशाचे श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना आणि निवडणूक नियोजनाला दिले जात आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची अधिकृत प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/CmqNXlW

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.