कुणाला संशय येऊ नये म्हणून अपहरण केलेले शेतकरी तुकाराम पाटील गव्हाणे यांना अपहरणकर्त्यांनी शनिवारी रात्रभर तसेच रविवारी दिवसभर शेतकऱ्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावून तसेच हात बांधून ब्रिझा कारमध्ये दोन दिवस कोंबून ठेवले होते. मात्र गुन्ह्याची सर्वत्र चर्चा झाल्याने बदनामी होऊ नये म्हणून रविवारी रात्री आरोपींनी शेतकरी गव्हाणे पाटील यांना बेदम मारहाण करून त्यांचा खून केला व मृतदेह कन्नड घाटात फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.आरोपींकडून एक छऱ्याची पिस्तूल, दोनचाकू, चिकटपट्टी, तीन मोठे रॉड, एकलहान रॉड, ब्रिजा कार, तसेच रोखरक्कम ८० हजार ५०० रुपये जप्त केले. या दरम्यान आरोपींनी तुकाराम पाटीलयांच्या तोंडाला चिकटपट्टी, हात बांधूनलोखंडी रॉडने मारहाण करून गंभीरजखमी केले होते. कारण तुकाराम पटेलयांच्या हातावर छातीवर मारहाणकेल्याची निशाणी दिसत होती. दुसऱ्यादिवशी अजिंठा पोलिस मृतशेतकऱ्याच्या दुचाकीचा शोध घेत होते.मात्र, उशिरापर्यंत दुचाकी सापडलीनाही. अपहरणच्या घटनेनंतर स्थानिकव्यापारी व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराटपसरली आहे. बदनामी टाळण्यासाठी खून शेतकरी अपहरणाची माहितीमिळताच आम्ही लगेच सर्व यंत्रणाकामी लावली. सर्वत्र सर्चऑपरेशन केले. मात्र तरी शेतकरीतुकाराम गव्हाणे पाटील हे वाचूशकले नाही याचे आम्हाला दुःखआहे. बदनामी होऊ नये आपलीओळख पटू नये म्हणूनचआरोपींनी शेतकरी तुकारामगव्हाणे पाटील यांचा खून केला,अशी माहिती अजिंठा येथीलसहायक पोलिस निरीक्षक अमोलढाकणे यांनी दिली. दुचाकी लपवल्याचा संशय उंडणगाव-बोदवड रस्त्यावर शेतकरी गव्हाणेपाटील हे दुचाकीने जात होते. त्याचवेळीअपहरणकर्त्यांनी त्यांची दुचाकी अडवूनत्यांना कारमध्ये कोंबले. या घटनेनंतरसंशयितांनी त्यांची दुचाकी लपवून ठेवल्याचासंशय आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीपोलिसांनी या दुचाकीचा परिसरात शोधघेतला. मात्र, दुचाकी सापडली नाही. पाचआरोपींपैकी एकाने आपल्या घरी दुचाकीलपवल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसमाहिती घेत आहेत. तसेच मृताचामोबाइलदेखील आरोपींनी कुठे फेकला,याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/fzo0cOI
अपहरणकर्त्यांनी शेतकऱ्याचे हात बांधून 2 दिवस कारमध्ये कोंबले:छऱ्यांचे पिस्तूल, दोन चाकू, 4 रॉड, 80,500 रुपये जप्त; तोंडाला चिकटपट्टी, हातावर, छातीवर मारहाणीच्या खुणा
December 30, 2025
0