Type Here to Get Search Results !

नऊ वर्षांपूर्वी ‘डमी’ परीक्षा भोवली; पीएसआय कोठडीत:भावाला पोलिस करण्यासाठी ‘तोतया’गिरी

आपल्या सख्ख्या भावाला खाकी वर्दी मिळवून देण्यासाठी एका पोलिस उपनिरीक्षकाने चक्क “मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाप्रमाणे “डमी’ गिरीचा प्रयोग केल्याचे उघड झाले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील या उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये थेट भावाच्या जागी बसून लेखी परीक्षा दिली. अखेर नऊ वर्षांनी त्याच्या या “डबल रोल’ चा बनाव अखेर उघडकीस आला असून या उपनिरीक्षकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने या उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे असे कोठडी झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्यासह भाऊ गजानन शिवलाल गुसिंगे (दोघे रा. रा. कौचलवाडी, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरोधात तोतयेगिरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवणे, कट रचणे या भारतीय दंड संहितेच्या कलमांसह परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल २०१६ रोजी सकाळी सहा वाजता शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर घडली. सुप्पडसिंग २०२३ ला पोलिस उपनिरीक्षक सुप्पडसिंग पोलिस दलात भरती झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून माहिती मागवली असता, सुप्पडसिंगची २०२३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली असून तो सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नियुक्त असल्याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा झाल्यावर पुणे पोलिसांनी सुप्पडसिंगला अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/8p3Zcug

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.