Type Here to Get Search Results !

मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या सूचना:म्हणाले- विभाग प्रमुखांनी गावपातळीवर राबवलेल्या योजनांच्या अहवाल तातडीने सादर करावा

सेनगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींना भेटीनंतर विभाग प्रमुखांनी त्या त्या विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्याा सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी गुरुवारी ता. ४ दिल्या आहेत. सेनगाव तालुक्यातील कवठा व वरुड चक्रपान या ठिकाणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे, के. एल. गड्डापोड, विजय बोराटे यांच्यासह अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पोषण आहाराच्या दर्जाची तपासणी केली तसेच पोषण आहाराची चव देखील घेतली. त्यानंतर शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांची संवाद साधला. शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ताही तपासली. तसेच ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करून गावांमधून फेरफटकाही मारला. या सोबतच आरोग्य केंद्रांना भेट देऊन रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. औषधीसाठ्याची तपासणी केली. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत या गावांमधून राबविण्यात आलेल्या योजनांची तपासणी करून त्याचा तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी दिल्या आहेत. या अहवालानंतर त्या गावांमधून सरप्राईज व्हिजीट देऊन अहवालानुसार कामे झाले किंवा नाही याची तपासणी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर गावांमधून एकाच वेळी शासकिय वाहनांचा ताफा आल्याने गावकऱ्यांतून चर्चेचा विषय होता.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Qqh4PCJ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.