राजगुरूनगर येथील एका खासगी क्लासच्या दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आपल्याच क्लासमधील मुलाचा गळा कापून खून केला. वाडा रस्त्यावरील नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळ संस्कार कोचिंग क्लासेसचे वर्ग भरतात. सोमवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शिक्षिका गणिताचा क्लास घेत असताना बेंचवर मागे बसलेल्या आरोपी विद्यार्थ्याने वर्गमित्राच्या पोटावर, गळ्यावर धारदार चाकूने वार केले. गळा खोलवर चिरला गेल्याने खूप रक्तस्राव झाला. त्याच अवस्थेत शिक्षिका आणि शेजाऱ्याने विद्यार्थ्याला दवाखान्यात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी विद्यार्थी स्वतःहून पोलिस चौकीत लगेचच हजर झाला. मृत आणि आरोपी यांच्यात यापूर्वी जुन्या भांडणाचा राग होता. त्यावरूनच त्याचा त्याने खून केला. मृत विद्यार्थी हा राजगुरूनगर येथे शिकत होता, तर आरोपी हा मांजरेवाडीतील शाळेत शिकतो. दरम्यान, क्लासच्या शिक्षिका जयश्री गणेश साबळे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील म्हणाले... मुलास ४ दिवसांपूर्वीही मारहाण मृत विद्यार्थ्यास ३-४ दिवसांपूर्वी ४-५ मुलांनी मारहाण केली होती. भांडण कशावरून किंवा काय झाले होते याचे कारण माहिती नसल्याचे मृत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी सांगितले.तसेच ३ महिन्यांपूर्वी वाद झाल्याचे सांगितले जाते, परंतु मला कल्पना नाही. सकाळी सरकारी दवाखान्यात येण्याचा निरोप मिळाला. मी तिथे गेलो. त्याची अवस्था बघवत नव्हती, असे मृत विद्यार्थ्याचे वडील म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/qY0m5eT
दहावीच्या विद्यार्थ्याचा क्लासमध्ये वर्गमित्राने केला गळा चिरून खून:राजगुरूनगरातील घटना, आरोपी विद्यार्थी स्वत:हून पोलिस ठाण्यात
December 15, 2025
0