Type Here to Get Search Results !

डॉ. कोंडबा हाटकर यांच्या ‘विवंचना’ कादंबरीचे 1 फेब्रुवारीला प्रकाशन:ज्येष्ठ समीक्षक डॉ. सतीश बडवे यांच्या हस्ते होणार प्रकाशन

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. कोंडबा (विवेकवर्धन) हाटकर यांच्या ‘विवंचना’ या दुसऱ्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना. गो. नांदापूरकर सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषीकेश कांबळे असतील. संत साहित्याचे सखोल अभ्यासक ज्येष्ठ समीक्षक डॉ. सतीश बडवे यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. कादंबरीवर स्त्रीवादी चळवळीच्या लेखिका डॉ. प्रतिभा अहिरे व आंबेडकरी चळवळीचे गायक डॉ. किशोर वाघ भाष्य करणार आहेत. यापूर्वी डॉ. हाटकर यांनी ‘बेदखल’ ही बहुचर्चित कादंबरी लिहिली आहे. ते दैनिक ‘सम्राट’सह अनेक परिवर्तनवादी नियतकालिकांत स्तंभलेखन करतात. ‘विवंचना’ ही सामाजिक कादंबरी असून ती वर्तमानातील ज्वलंत प्रश्नांचा सखोल वेध घेते. ही कादंबरी कैलास पब्लिकेशनने प्रकाशित केली आहे. या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीचे प्रमुख डॉ. रामेश्वर वरसिळ, सिंधू लोणकर व लेखक डॉ. कोंडबा हाटकर यांनी केले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RLBCes2

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.