उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारीदरम्यान तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, आता ५ फेब्रुवारीऐवजी शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी होईल. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ३१ जानेवारी रोजी सुधारित कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. राजकीय दुखवट्याच्या कालावधीत थांबलेल्या प्रचारासाठी उमेदवारांना पुढे वाढीव कालावधी मिळावा, यासाठी हे बदल करण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली आहे. प्रचारतोफा ५ तारखेला थंडावणार वेळापत्रक बदलल्यामुळे आता प्रचारासाठी उमेदवारांना दोन दिवस जास्तीचे मिळणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यानंतर ७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडेल. निकाल जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमधील आचारसंहिता संपुष्टात येईल. सुधारित निवडणूक कार्यक्रम असा... सुधारित सूचना प्रसिद्धी : ३१ जानेवारी २०२६ प्रचार सांगता : ५ फेब्रु. (रात्री १० वा) मतदान: ७ फेब्रुवारी (सकाळी ७.३० ते ५.३०) मतमोजणी: ९ फेब्रुवारी (सकाळी १० वा. पासून) राजपत्रात प्रसिद्धी: ११ फेब्रुवारी २०२६ उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, परभणीसह १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे:- १२ जिल्हा परिषदांच्या ७३१ जागा -७,८८६ एकूण उमेदवारी अर्ज दाखल. -६,२३१ अर्ज छाननीत वैध. २३० अर्ज बाद. -३,६०७ उमेदवारांचे अर्ज माघारी -२,६२४ एकूण उमेदवार मैदानात १२५ पंचायत समित्यांतील १४६२ जागा : -१३,९२७ एकूण उमेदवारी अर्ज दाखल. -१०,९३२ अर्ज छाननीत वैध, ४०५ अर्ज बाद. -६,११८ उमेदवारांचे अर्ज माघारी. -४,८१४ एकूण उमेदवार मैदानात
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/3knsX2q
जि.प., पंचायत समितीसाठी आता 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला होणार मतदान:आयोगाकडून नवे वेळापत्रक जाहीर, 9 फेब्रुवारीला निकाल
January 29, 2026
0