शीख पंथाचे नववे गुरू श्री गुरुतेगबहादूरजी यांचा ३५० वा शहिदी समागम समारंभ हिंद-दी-चादर २४ व २५ जानेवारीला नांदेडमध्ये होईल. येथे दहा लाख भाविक येणार आहेत. मोदी मैदानावर ५२ एकर परिसरात गुरुद्वाराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. मुख्य कार्यक्रमस्थळी २ बाह्यरुग्ण विभाग, ५ खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारणे सुरू आहे. येथे विविध आजारांची मोफत तपासणी, सल्ला व औषधोपचार सेवा दिली जाणार आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी ६ रेल्वेगाड्यांची मोफत व्यवस्था केली आहे. कार्यक्रमस्थळी १० शासकीय रुग्णवाहिका तसेच टोल फ्री क्रमांक १०८ अंतर्गत १५ रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयामार्फत नेत्र तपासणी करून गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार असून, तपासणीअंती वृद्ध नागरिकांना काठी वाटप करण्यात येणार आहे. दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत महापुरुषांचे आशीर्वचन, कथा, कीर्तन व प्रवचन असणार आहेत. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून सुमारे १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये येतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सहा रेल्वेंची व्यवस्था हिंद-दी-चादर कार्यक्रमात भाविकांना सहभागी होता यावे यासाठी मुंबई, हैदराबाद , पंजाब, चंदीगड, हरियाणा, अमृतसर येथून सहा रेल्वेगाड्यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या रेल्वेगाड्यांमधील प्रवास भाविकांसाठी मोफत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4c7nr9v
हिंद-दी-चादर कार्यक्रमासाठी दहा लाखांवर भाविक येणार:नांदेडमध्ये 8 लंगरद्वारे 24 तास महाप्रसाद
January 20, 2026
0