Type Here to Get Search Results !

धामणगाव रेल्वे न.प. उपाध्यक्षपदी गिरीश मुंधडा यांची बिनविरोध निवड:नगराध्यक्ष अर्चना अडसड यांच्या अध्यक्षतेखाली घोषणा

धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी गिरीश (बंडू) पुखराज मुंधडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगराध्यक्ष अर्चना अडसड (रोठे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. ही निवड मंगळवारी, १३ जानेवारी रोजी पार पडली. नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली बैठक नगरपालिका सभागृहात घेण्यात आली. याच बैठकीत डॉ. असित पसारी आणि ॲड. रीना मनोज व्यास यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषणा करण्यात आली. उपाध्यक्षपदी निवड झालेले गिरीश मुंधडा हे सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेणारे व्यक्ती आहेत. ते गोरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, श्रीराम शिक्षण संस्थेचे संचालक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आहेत. त्यांच्या अनुभवामुळे नगर परिषदेत समतोल आणि विकासाभिमुख नेतृत्वाला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवड बैठकीला मुख्याधिकारी पूनम कळंबे, कार्यालय अधीक्षक प्रतिभा डोंगरे, गट नेते नरेंद्र चौधरी, नगरसेवक डॉ. हेमकरण कांकरीया, गोपाल द्विवेदी, रवि कुकरेजा, मुरलीधर पतके, दर्शन राठी, जगदीश राय, विलास बूटले, अंशुल बडगैया, मंजिरी भोगे, प्रतिभा खोब्रागडे, मनिषा शिरभाते, रीना साहू, रंजना शेलोकार, सीमा बागडे, प्रियंका जवंजाळ, काजल उपरीकर, सीमा पेंदाम, अंजली मार्वे, स्वच्छता निरीक्षक आकाश सोनेकर, लेखापरीक्षक रत्नेश खडसे, प्रशासकीय अधिकारी विनोद अंबाडकर, कर व प्रशासकीय अधिकारी पंकज इंगळे, नगर अभियंता शेखर ढबाले, कनिष्ठ अभियंता प्रदीप सहारे आदी उपस्थित होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/prN56oM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.