Type Here to Get Search Results !

निवडणुकीत लढले परस्परांविरुद्ध, मनपाच्या सत्तेसाठी येणार एकत्र:बहुमताची शक्यता नाही; शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात

महापालिकेच्या ११५ जागांसाठी मतदान संपल्यानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांना पुन्हा एकत्र यावे लागेल, असे चित्र आहे. दोन्ही पक्षांना एकत्र येऊनही बहुमतापर्यंत जाता आले नाही, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली जाईल. महापालिकेच्या ११५ जागांपैकी जवळपास ३५ ते ४० जागांवर मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. त्यामुळे उर्वरित ७५ ते ८० जागांसाठी महायुतीमध्ये स्पर्धा होती. युती केल्यास आपल्या वाट्याला पुरेशा जागा येणार नाहीत. त्यामुळे शहरात मोठा पक्ष ठरण्याच्या उद्दिष्टाला सुरूंग लागू शकतो. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांना न्याय देता येणार नाही. त्यामुळे भाजप व शिंदेसेनेने युती तोडण्याचा निर्णय घेतला. त्यातून उद्धवसेना स्पर्धेत आल्याचे मानले जाते. हिंदू मतदारांचे प्राबल्य असलेल्या बहुतांश जागा शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागांत आहेत. सिडको-हडको या पूर्व छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात चुरस होती. मात्र, मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांचे प्राबल्य असलेल्या भागात उद्धवसेनेचाही जोर होता. त्यामुळे मतविभागणीचा फटका तिन्ही पक्षांना बसू शकतो. मतदारांनी पॅनल तोडून क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चाही सिडको-हडकोत जास्त होती. आपल्या भागातले, आपल्या ओळखीचे, नातेसंबंध आणि जात यांच्या आधारावर मतदान करण्यात आले. अजित पवार गटाकडे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात ७८ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. १० ते १२ जागांवर पक्षाचे उमेदवार शर्यतीत असल्याचे मानले जाते. त्यातून ४ ते ६ जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मदत महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप व शिंदेसेनेला होईल, असे मानले जाते. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शिवसेना, भाजपच्या विरोधात असलेली उद्धवसेनेकडे जाणारी मते आपल्याकडे वळवल्याचे मानले जाते. शिवसेना, भाजपची कामगिरी वर्ष एकूण जागा भाजप शिवसेना १९८८ ६० ०० २७ १९९५ ८२ ०७ ३४ २००० ८३ १६ २० २००५ ९९ २१ २६ २०१० ९९ १५ ३० २०१५ ११५ २२ २८ दक्षिण शहरात मतदानात चुरस दक्षिण संभाजीनगरमध्ये शिवसेना व भाजप यांच्यात स्पर्धा तीव्र होती. त्याच वेळी उद्धवसेनेची ‘कमिटेड व्होटर्स’ भिस्त होती. दुपारी चार-साडेचारनंतर मतदारांची संख्या वाढली. त्यामुळे काही भागांत मतदान केंद्रांवर साडेपाचनंतरही रांगा होत्या. बहुतांश प्रभागांत हिंदू मतदारांचे प्राबल्य असले तरी मुस्लिम व मागासवर्गीयांच्या वसाहतीही आहेत. एमआयएमचे उमेदवार नाहीत. काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुस्लिम मते उद्धवसेनेच्या पारड्यात जाण्याची शक्यता जास्त आहे. दक्षिण संभाजीनगरमधील काही प्रभागांत उद्धवसेना शर्यतीत येईल, असे मानले जाते. कार्यकर्त्यांच्या दबावाखाली तुटली युती महापालिकेची निवडणूक दहा वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी दोन निवडणुका झाल्या. या निवडणुकांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून कष्ट उपसले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या निवडणुका प्रतिष्ठेच्या होत्या. त्या वेळी शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे युतीला यश मिळाले. या निवडणुकांत कार्यकर्त्यांना महापालिकेच्या उमेदवारीसाठी शब्द दिले होते. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कार्यकर्ते इरेला पेटले. त्यामुळे दोन्ही पक्षांवर स्वबळावर निवडणुका लढण्याची वेळ आली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/aWI2eE8

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.