Type Here to Get Search Results !

राज्यात महिलांसाठी शासकीय रुग्णालयांत‎‘मेनोपॉज क्लिनिक’:दर बुधवारी तपासणी, आवश्यक उपचार, समुपदेशनासोबत आहाराचे मार्गदर्शन‎

राज्यात महिलांच्या रजोनिवृत्ती‎काळात उद्भवणाऱ्या शारीरिक व‎मानसिक समस्यांवर वेळेवर उपचार‎मिळावेत, या उद्देशाने सार्वजनिक‎आरोग्य विभागामार्फत विशेष‎‘मेनोपॉज क्लिनिक’ १४‎जानेवारीपासून सुरू करण्यात आली‎आहे. दर बुधवारी सर्व शासकीय‎रुग्णालयांमध्ये या क्लिनिकची‎सुरवात झाली आहे. यापुढे दर‎बुधवारी विशेष बाह्यरुग्ण विभाग‎(ओपीडी) सुरु राहणार असून‎त्यामुळे महिलांना आरोग्य विषयक‎मार्गदर्शन मिळणार आहे.‎ महिलांच्या रजोनिवृत्तीच्या‎काळात हार्मोन्समधील बदलांमुळे‎शारिरातील उष्णता वाढ, झोपेचे‎विकार, चिडचिड, नैराश्य,‎सांधेदुखी, वजन वाढणे,‎हृदयविकाराचा धोका अशा विविध‎समस्या येतात. मात्र महिलांकडून या‎समस्यांकडे अनेकवेळा दुर्लक्ष केले‎जाते. त्यांना पुढील काळात गंभीर‎समस्यांना सामोरे जावे लागले. या‎काळात महिलांना योग्य मार्गदर्शन,‎समुपदेशन व औषधोपचार‎मिळण्यासाठी आरोग्य विभागाने‎महिलांसाठी स्वतंत्र ‘मेनोपॉज‎क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय‎घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा‎रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये,‎महानगरपालिका रुग्णालये तसेच‎निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे‎क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना‎देण्यात आल्या आहेत. त्यानुसा‎बुधवारी राज्यातील शासकिय‎रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय तसेच‎काही निवडक ग्रामीण रुग्णालयात‎क्लिनीक सुरु करण्यात आले आहे.‎महिलांनी लाभ घ्यावा.‎ तपासण्यांची माहिती देणार‎ या क्लिनिकमध्ये महिलांची‎वैद्यकीय तपासणी करण्यात आली‎असून आवश्यकतेनुसार उपचार,‎समुपदेशन, आहार व‎जीवनशैलीविषयक मार्गदर्शन केले‎जाणार आहे. मानसिक‎आरोग्याविषयी समुपदेशन,‎कॅल्शियम व व्हिटॅमिन-डी‎संदर्भातील उपचार आणि‎आवश्यक तपासण्यांविषयी माहिती‎दिली जाईल.‎ महिलांनी लाभ घ्यावा‎ हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात‎हे क्लिनिक सुरु झाले असून यापुढे‎दर बुधवारी होणाऱ्या या विशेष‎बाह्यरुग्ण तपासणीचा महिलांनी‎लाभ घ्यावा. रजोनिवृत्ती‎काळातील लक्षणांबाबत संकोच न‎ठेवता उपचारासाठी महिलांनी‎तपासणीसाठी पुढे येणे अपेक्षित‎आहे, असे आवाहन हिंगोलीच्या‎शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता‎डॉ. चक्रधर मुंगल यांनी केले.‎‎

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/aZCjfJk

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.