पैठण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. तालुक्यात दिग्गज मैदानात उतरले आहेत.त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलीआहे. अनेकांनी साम-दामवरही भर दिला आहे. खासदार संदिपान भुमरे यांचे पुतणेशिवराज भुमरे पाचोड जिल्हा परिषद गटातूनलढत आहेत. येथे राष्ट्रवादी अजित पवारगटाचे उमेदवार त्यांच्या समोर आहेत.आमदार विलास भुमरे यांनी येथे विशेष लक्षदिले आहे. भुमरे यांचे विरोधक, नुकतेचभाजपमध्ये आलेले दत्तात्रय गोर्डे, नवगावगटातून लढत आहेत. नांदर गणातून ठाकरेगटाचे व माजी सभापती राहिलेले डॉ. सुनीलशिंदे आपले नशीब नांदरमधून अजमवतआहेत. येथे काँग्रेसचे नेते रविंद्र काळे यांनीशिवसेना शिंदे गटाबरोबर हातमिळवणी केलीआहे. पुतण्यांना येथून पंचायत समितीसाठी उभे केले आहे. माजी आमदार संजयवाघचौरे यांनी ढोरकीनमधून पत्नीलाउभे केले आहे. या दिग्गज नेत्यांनीआपल्या कुटुंबातील सदस्यांनानिवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.नेहमी कार्यकर्त्यांसाठी गावात नफिरकणारे नेते आता कुटुंबातीलसदस्यांसाठी डोर टू डोर जात आहेत.अनेक गटांमध्ये दिग्गजांसमोर नवीनचेहरे उभे असल्याने सामान्य मतदारकोणाच्या बाजूने राहणार, हे बघावेलागणार आहे. नेत्यांचा साम-दामवर जोर अनेक नेत्यांच्या घरातील सदस्यउमेदवार असल्याने सर्कलमध्येप्रचार करत असतानासाम-दामवर भर दिला जातआहे. नेहमी कार्यकर्त्यांसाठी एकरुपयाही न लावणारे नेते आतालाखो रुपये आपल्या कुटुंबातीलउमेदवारांच्या प्रचारासाठी खर्चकरीत आहेत. खरा मतदार राजाआपली ताकद काय दाखवतो, हेनिकालानंतरच कळेल. ऐरवी नदिसणारे नेते आता गावोगावदिसत आहेत. शिंदे गटासमोर भाजपचे आव्हान पैठण तालुक्यात ग्रामीण भागात काँग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादीचे संघटन मजबूतमानले जाते. अलीकडील स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांनंतर भारतीय जनतापक्षही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे.सध्या भाजपमध्ये दत्तात्रय गोर्डे आल्यानेभाजप पुरस्कृत उमेदवार सर्व ठिकाणीदेण्यात आले आहेत. यामुळे शिवसेनाविरोधी भाजप अशी लढत अनेक गटातहोणार आहे. महाविकास आघाडीमधीलनेत्यांमध्ये समन्वय नसल्याने उमेदवार उभेकेले असले तरी नेतृत्व करण्यासाठी नेतानसल्याचे स्थानिकांना दिसून येत आहे. गोर्डे भुमरेंचे मुख्य विरोधक शिवराज भुमरे हे पहिल्यांदाच जि.प.लढत असून विकासाचा मुद्दा घेऊनते मतदारांकडे जात आहेत. संजयवाघचौरे यांच्या पत्नी सुनिता याढोरकीनमधून जिल्हा परिषद लढतआहेत. या भागात त्यांचे नातेगोतेजास्त आहेत. तर, डॉ. सुनील शिंदेनांदर गणातून लढत असून त्यांना यानिवडणुकीत या पूर्वीचा अनुभवकामी येईल. दत्तात्रय गोर्डे यांच्याआई चंद्रकला या नवगाव गटातूनलढत आहेत. गोर्डेंकडे भुमरेंचे मुख्यविरोधक म्हणून पाहिले जाते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/l6AMn9x
पैठणला दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला:माजी आमदारांच्या पत्नीसह खासदारांचे पुतणे, गोर्डे, शिंदे मैदानात; अनेक गटांमध्ये शिवसेना- भाजपत लढत
January 25, 2026
0