Type Here to Get Search Results !

मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपमध्ये अंतर्गत ‘फील्डिंग’:तावडे, म्हात्रे की द्विवेदी? बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच आता भाजपमध्ये महापौरपदाच्या उमेदवारीसाठी अंतर्गत गटबाजी आणि लॉबिंगला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील उमेदवारालाच संधी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात असले तरी पक्षातील विविध गटांनी आपापल्या समर्थकांसाठी दिल्ली आणि नागपूरपर्यंत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील नगरसेविका रितू तावडे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. तावडे यांच्यासाठी विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रसाद लाड यांनी कंबर कसली आहे. तावडे या मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना घाटकोपर पूर्व या सुरक्षित जागेवरून निवडून आणण्यात चित्रा वाघ यांची मोठी भूमिका होती. नागपूरविरुद्ध स्थानिक नेत्यांचा जोर बोरिवलीतून ओबीसी कोट्यातून निवडून आलेल्या रीना द्विवेदी-निघुट यांच्यासाठी पक्षातील “नागपूर लॉबी’ सक्रिय झाली आहे. द्विवेदी यांना उमेदवारी मिळण्यामागे नागपूरमधील बड्या नेत्यांचा हात असल्याचे बोलले जाते. मात्र, मुंबई महापौरपद खुला प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित झाल्याने ओबीसी उमेदवाराला संधी मिळेल का, याबाबत साशंकता आहे. मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मात्र आपल्या बांद्रा पश्चिम विधानसभा क्षेत्रातील स्वप्ना म्हात्रे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. म्हात्रे या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. ‘सामान्य’ आरक्षण असूनही भाजपचा ओबीसी कार्डावर विचार? मुंबईच्या महापौरपदाची लॉटरी “सामान्य महिला’ गटासाठी निघाली असली तरी भाजपमध्ये जातीच्या समीकरणापेक्षा आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील प्रभाव पाहिला जात आहे. एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, आरक्षण खुल्या प्रवर्गाचे असले तरी भाजप ओबीसी मतांना आकर्षित करण्यासाठी रीना द्विवेदी किंवा स्वप्ना म्हात्रे यांना संधी देऊ शकते. रितू तावडे यांच्यासाठी फील्डिंग लावणारे दरेकर आणि लाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Bt9e4wb

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.