Type Here to Get Search Results !

शिवसेनेत गटनेतेपदावरून पुन्हा वाद; जंजाळ अन् तुपे यांच्यात शह-काटशहाचे राजकारण:10 नगरसेवकांचा तुपे यांना पाठिंबा, तर जंजाळ म्हणतात, ‘एकनाथ शिंदेच ठरवतील’

महानगरपालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदाच्या निवडीवरून पुन्हा एकदा अंतर्गत राजकारण तापले आहे. उपमहापौर निवडीच्या वेळी राजेंद्र जंजाळ आणि त्र्यंबक तुपे यांच्यात झालेला संघर्ष आता गटनेतेपदाच्या निमित्ताने पुन्हा समोर आला असून, हा वाद आता थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी पोहोचला आहे. महापालिकेत गटनेते निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून शिवसेनेच्या १३ पैकी १० नगरसेवकांनी त्र्यंबक तुपे यांच्या नावासाठी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी सुरू केली आहे. मात्र, अद्याप अधिकृत ठराव झालेला नसल्याने पेच कायम आहे. शिंदेंकडून तुपेंच्या नावाला पसंती दिली १८ तारखेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. माझे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी त्र्यंबक तुपे यांच्या नावाला पसंती दिली आहे. - संजय शिरसाट (पालकमंत्री) पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणार मी पाचव्यांदा निवडून आलो आहे. आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात कागदपत्रे दिली असून त्रुटींची पूर्तता करत आहोत. पालकमंत्र्यांनी मला गटनेतेपदासाठी संधी दिली आहे. दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडणार आहे.- त्र्यंबक तुपे जुन्या वादाचे उट्टे या संघर्षाला जुनी पार्श्वभूमी आहे. राजेंद्र जंजाळ जेव्हा उपमहापौर झाले, तेव्हा शिवसेनेच्या १० नगरसेवकांनी त्यांना विरोध केला होता. त्या विरोधाचे नेतृत्व त्र्यंबक तुपे यांनी केले होते. त्या वेळी जंजाळ यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बाजी मारली होती. आता गटनेतेपदासाठी तुपे यांचे नाव पुढे आल्यामुळे, जंजाळ जुन्या वादाचा हिशोब चुकता करणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पदाचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्रीच घेतील पक्षाने अद्याप गटनेतेपदाचा निर्णय घेतलेला नाही. गटनेतेपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तोच गटनेता होईल. पक्षीय नेतृत्वच याबाबत अंतिम शब्द सांगेल. - राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/BTxtgOw

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.