Type Here to Get Search Results !

120 किमी वेगातील कारउलटून जळगावचे दोन ठार:पाचोऱ्याजवळील घटना, चार जण झाले जखमी

नाचनखेडा (ता. पाचोरा) येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार उलटल्याने जळगावच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ४ जण जखमी झाले. अपघात होण्याच्या १० ते १५ सेकंदांआधी चालकाने सोशल मीडियावर स्पीड मीटरचे केलेल्या लाइव्ह व्हिडिओमध्ये कारचा वेग ताशी १२० किमी होता. अचानक धडाम असा आवाज आणि किंचाळण्याचे आवाज ऐकू आले. पाचोरा-जळगाव रस्त्यावर खेडगाव नंदीचे गावाजवळ गुरुवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. श्रीरंग सुरेश पाटील (२५), प्रसन्न रवींद्र निमजे असे मृतांची नावे आहेत. मृत व जखमी हे जळगाव शहरातील पिंप्राळा येथील रहिवासी आहेत. हळदीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी एका परिचिताची कार मागून घेतली होती. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कार्यक्रम आटोपून मित्र निघाले. या वेळी कारवरील नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला. चारच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न ... सेंट्रल बँक कॉलनीत राहणारा श्रीरंग एमआर होता. २६ नोव्हेंबर २५ रोजी त्याचे पिंप्राळा येथे राहणाऱ्या मामाच्या मुलीशी लग्न झाले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी आहेत. त्यांनी एकुलता एक भाऊ या अपघाताने गमावला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/U586d0G

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.