Type Here to Get Search Results !

राज्यात कापूस उत्पादकांना दिलासा: खरेदीची मुदत आता 15 मार्चपर्यंत:उद्यापासून हरभरा नोंदणीलाही सुरुवात होणार असल्याची रावल यांची माहिती

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा मिळवून दिला आहे. कापूस खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी लक्षात घेता, केंद्र सरकारने आता ही मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी विधानसभेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रश्नी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे. कापूस खरेदीची मुदत संपत असल्याने शेतकरी चिंतेत होते. अनेक ठिकाणी कापूस शिल्लक असल्याने मुदतवाढीची आवश्यकता होती. पणन विभागाने यासंदर्भात प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुदतवाढीमुळे आता शेतकऱ्यांना आपला उरलेला कापूस हमीभावाने विकता येणार आहे. उद्यापासून ५८७५ रुपयांनी हरभरा खरेदी कापसासोबतच राज्य सरकारने हरभरा उत्पादकांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे. १ मार्च २०२६ पासून राज्यात हरभरा खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. शासनाने हरभऱ्यासाठी ५८७५ रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव निश्चित केला आहे. या निर्णयामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या मार्केटिंगसाठी शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून बाजारपेठेतील संभाव्य चढ-उतारांपासून त्यांचे संरक्षण होणार आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Xxt9RSn

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.