राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून स्थगित करण्यात आली होती. मात्र, संबंधित खात्याची जबाबदारी सांभाळणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांत मंत्रालयातून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली होती. यावर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. आता या प्रकरणी मोठी कारवाई करत अल्पसंख्यांक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांचीह बदली करण्यात आली आहे. अजित पवारांचे 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात शोक व्यक्त केला जात असतानाकज दुसरीकडे मात्र याच दिसवही दुपारी 3 वाजता मंत्रालयात अल्पसंख्यांक विभागामार्फत प्रमाणपत्रे वाटली गेली. तसेच मंत्रालयातून अल्पसंख्यांक दर्जा देण्यात येणारे पहिले प्रमाणपत्र देखील जारी करण्यात आले. शासकीय दुखवटा असताना मंत्रालयातून 75 संस्थांना प्रमाणपत्रे देण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अल्पसंख्यांक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणी उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, या प्रकरणाची आता सखोल चौकशी करण्यात येणार आहे. प्रत्येक फाईलमागे 25 लाख रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, या वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित फाईल्सना स्थगिती देत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटप प्रकरणात योग्य कारवाई होईल- मुख्यमंत्री फडणवीस राज्यात गाजत असलेल्या 75 शिक्षण संस्थांना देण्यात आलेल्या अल्पसंख्यांक प्रमाणपत्र प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घोटाळ्यात मंत्रालयातील एका उपसचिवाचे नाव समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. "प्रमाणपत्र वाटपात ज्यांनी कोणी अनियमितता किंवा गडबड केली असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल," असे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले. वाचा सविस्तर
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Thi4M5g
अल्पसंख्यांक प्रमाणपत्र वाटप प्रकरण:उपसचिव मिलिंद शेणॉय यांची उचलबांगडी, राज्य सरकारची मोठी कारवाई
February 17, 2026
0