Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस कलाकार कट्टा बचावासाठी रस्त्यावर:पुण्यात कलाकारांनी काळे कपडे घालून मूक निदर्शने केली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने डेक्कन येथील कलाकार कट्ट्याच्या बचावासाठी सोमवारी मूक आंदोलन केले. या आंदोलनात अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. कलाकार कट्ट्यावर काळे कपडे परिधान करून आणि तोंडाला काळी पट्टी बांधून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील टिंगरे, विरोधी पक्ष नेते निलेश निकम, रुपाली ठोंबरे पाटील आणि राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी यावेळी सांगितले की, गुडलक चौकातील कलाकार कट्टा हे पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. हा केवळ एक कट्टा नसून, कलाकारांच्या अभिव्यक्तीचे आणि विचारमंथनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यांनी म्हटले की, जर अजितदादा पवार नेतृत्व करत असते, तर त्यांनी निश्चितच कलाकारांचे म्हणणे ऐकून न्याय दिला असता. टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे या प्रकरणी विनंती करणार असल्याचे सांगितले. त्या कलाकार कट्ट्याच्या प्रश्नावर सकारात्मक आणि ठोस भूमिका घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी आणि कलाकार कट्टा कायम ठेवण्यासाठी हा लढा सुरूच राहील, अशी ठाम मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले की, कलाकार कट्टा हे पुणे शहरातील कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ आहे. हा कट्टा रस्त्याच्या एका बाजूला असूनही, भाजपच्या नगरसेवकांनी तो वाहतुकीस अडथळा ठरत असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा कट्टा हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाला आपला तीव्र विरोध राहील, असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले. कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी कलाकार कट्टा अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे, असेही त्यांनी नमूद केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/VQu53Gv

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.