Type Here to Get Search Results !

पैठणला रात्री चालकाचा ताबा सुटल्याने कार तलावात कोसळली:तीन जण बेपत्ता, पती-पत्नी बुडाले, मदतीसाठी गेलेला तरुण चांगतपुरीचा, चालक बचावला

चालकाचा ताबा सुटल्याने कार उजव्या कालव्यात कोसळून कारमधील पती-पत्नी आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेला तरुण असे तीन जण बेपत्ता झाल्याची घटना चांगतपुरी (ता. पैठण) येथे सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास घडली, अशी माहिती सरपंच प्रतिनिधी साईनाथ व्होरकटे यांनी दिली. सोमवारी रात्री स्विफ्ट कार (एमएच १२ के जे ९०३२) चांगतपुरी- पैठण रस्त्याने जात होती. कारमध्ये चालक अल्ताफ पठाण, मुखीद शेख व त्यांची पत्नी निलोफर मुखीद शेख (दोघे रा.कोरडगाव, ता.शेवगाव) असे तिघेजण होते. चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलालगत चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार कालव्यात गेली. दरम्यान, चालकाने प्रसंगावधानता बाळगत कारबाहेर उडी मारली. कालव्याला पाणी असल्यामुळे कारमधील पती-पत्नी असे दोघे कारसह पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा जेसीबीने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. यावेळी स्थानिकांपैकी रावसाहेब खडेकर (रा.चांगतपुरी) हा बचावकार्यासाठी पाण्यात उतरला होता. परंतु मदत करताना पती-पत्नीसह तोदेखील बेपत्ता झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्यात बेपत्ता झालेल्या तिघांचा शोध सुरू होता.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5bpAJmE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.