काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार प्रज्ञा सातव यांचा विधान परिषदेतील राजीनामा मंगळवारी मंजूर करण्यात आला. मात्र, हा राजीनामा त्यांनी स्वच्छेने दिला की त्यांच्यावर काही दबाव होता, याची सविस्तर माहिती सभागृहाला द्यावी, अशी आक्रमक मागणी करत विरोधकांनी विधान परिषदेत मोठा गदारोळ केला. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने विधान परिषदेवर संधी दिली होती. त्यांच्या आमदारकीचा अजून तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाच, त्यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा थेट सभापतींकडे सोपवला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी सभापती प्रा. राम शिंदे यांनी हा राजीनामा मंजूर केल्याची घोषणा केली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5Aq9RiK
प्रज्ञा सातव यांचा राजीनामा दबावाखाली?:विरोधकांचा विधान परिषदेमध्ये गदारोळ
February 24, 2026
0