Type Here to Get Search Results !

एखाद्याने बोलायचे अन् मी जायचे असे होत नाही- पाटील:सांगलीमध्ये सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता लगावला टोला

एखाद्याने बोलायचे आणि मी जायचे असे होत नाही. ज्याला जायचं आहे तो जातोच, असे प्रेडिक्शन करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मतदार वक्तव्ये करणाऱ्यांना उत्तर देतील. सामान्य जनतेशी आमचा संपर्क आहे. मतदार चुकीच्या प्रवृत्तींना जागा दाखवतील, असा टोला शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता लगावला. या निवडणुकीत माझ्याविरोधात सर्व प्रयोग करून पहिले. ते अपुरे पडतायत म्हणून भानामतीसारखे प्रकार करत आहेत. बापूंबद्दल अपशब्द वापरण्यात आले. वाळवे तालुक्यातील जनता याला उत्तर देईल. चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्यातील भाजपचे नेते कमी माहिती देतात. निकाल लागल्यानंतर त्यांना कळेल. सोलापूर, पुणे यांसह अनेक ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादीशी आघाडी केली आहे. त्यामुळे चांगले निकाल लागतील, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी बोलून दाखवली. शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. अमेरिकेचा शेतीमाल शून्य टक्के दराने येणार आहे. अमेरिकेचे दूध पदार्थ शून्य टक्क्याने येणे आणि आपण १८ टक्के कर भरल्याशिवाय पाठवता येणार नाही, अशी व्यवस्था पूर्वीच तयार केली आहे. आज अमेरिकेच्या शेतकऱ्यांना गालिचा आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना काटेरी वाट तयार केल्याची टीकाही त्यांनी केली. सत्तेचा गैरवापर करून दडपण सध्या सत्तेचा गैरवापर करून कार्यकर्त्यांवर दडपण आणण्याचे राजकारण सुरू आहे, मात्र अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. लोकशाहीत जनतेचा कौल अंतिम असतो, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Azk8Qfl

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.