Type Here to Get Search Results !

रिक्षात तरुणीचा मृतदेह; सावत्र आई-वडील पोलिसांच्या ताब्यात:वाळूज परिसरातील तिसगाव चौफुली येथील धक्कादायक प्रकार

वाळूज महानगर परिसरात तिसगाव चौफुली येथे एका रिक्षात २० वर्षांच्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या सावत्र आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरादरम्यान उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब गादीमध्ये काहीतरी गुंडाळून रिक्षाद्वारे कन्नडच्या दिशेने जात होते. मात्र, या हालचाली संशयास्पद वाटल्याने एका नागरिकाने तातडीने डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तिसगाव चौफुली येथे रिक्षा अडवली. पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता आत गादीमध्ये गुंडाळलेला तरुणीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी विचारपूस केली असता, “मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावी घेऊन जात आहोत,’ अशी माहिती सावत्र आई-वडिलांनी दिली. आत्महत्या की घातपात? पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिसांनी सावत्र आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात? याचा तपास वाळूज पोलिस करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5Nfs0PJ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.