राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेचे शंभरावे वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने संघाच्या संघटनात्मक रचनेत काही बदल केले जात आहेत. सध्या संघाचे देशात ४६ प्रांतनिहाय काम चालते. नव्या बदलात ४६ प्रांतांऐवजी ८६ विभाग केले जातील. त्या विभागनिहाय संघाचे काम चालणार आहे. नवी विभाग रचना तसेच इतर उपक्रमांतून ‘जेन-झी’ला (तरुण पिढी) संघाकडे खेचण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका प्रकट मुलाखतीत सांगितले की, देशाची प्रगती करत आपली परंपरा आणखी समोर न्यायची असा विचार ‘जेन झी’मध्ये दिसून येतो. त्यांना प्रामाणिकता, सेवेचे आकर्षण आहे. त्यामुळेच त्यांची संघविचारांशी नाळ जुळत असून, ते संघकार्यासाठी अनुकूल आहेत. ‘जेन झी’साठी संघ काय करणार, सध्या काय करत आहे १ प्रत्यक्ष शाखेत येणे शक्य नसेल. मात्र संघकार्याशी जोडण्याची इच्छा असणाऱ्यांना उपयुक्त व्यवस्था केली जाईल. त्यादृष्टीने शहरातील टोलेजंग इमारती, सोसायटीत तरुणांशी संपर्क साधण्यावर भर. २ संघाचा प्रसिद्धी विभाग ‘इन्फ्लुएन्सर्स’, ‘यूट्यूबर्स’सोबत बैठक आयोजित करो. त्यांना विविध विषयांची सविस्तर माहिती दिली जाते. संबंधित साहित्यही संघाकडून उपलब्ध करून दिले जाते. अ) राष्ट्रीय सेवा संघाच्या रचनेत बदल का? शंभर वर्षांच्या कार्यकाळात संघाचे काम मोठे झाले आहे. त्यामुळे रचना विकेंद्रित होणे आवश्यक झाले. संघाकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत व स्वयंसेवकांची कामेदेखील वाढली आहेत. अनेकदा कामादरम्यान शासन-प्रशासनाशी संबंध येतो. त्यासाठी वेगळी व्यवस्था हवी या विचारातून प्रांताऐवजी आता विभागाची रचना तयार करण्यात आली आहे. ब) बदलाने कार्यपद्धतीत बदल होईल का? नाही. लोकांशी मैत्री करायची व आपल्या उदाहरणातून परिवर्तन घडवायचे हीच संघाची कार्यपद्धती कायम राहील. यातून भाजपसाठी व्होट बँक तयार होऊ शकते. क) सोशल मीडियाविषयी काय करणार? पंचपरिवर्तनासारख्या उपक्रमातून समाजापर्यंत जाण्यावर भर देण्यात येत आहे. आपला मुद्दा योग्य पद्धतीने, शिस्तशीर असावा, यासाठी प्रशिक्षण व्हायला हवे. ड) महाराष्ट्रात सध्या संघाचे किती, कोणते प्रांत आहेत? विदर्भ (नागपूर अमरावती विभाग), देवगिरी (मराठवाडा), कोकण (मुंबई, ठाणे, कोकण), पश्चिम महाराष्ट्र (पुणे, कोल्हापूर) असे चार प्रांत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/i6DVlMX
संघात संघटनात्मक बदल; 46 प्रांतांऐवजी 86 विभाग:‘जेन झी’ला संघाकडे खेचण्यासाठी पावले- सरसंघचालक
March 19, 2026
0