Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र केसरी: माती विभागात महेंद्र, सिकंदर विजयी:गादी विभागात शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळची एकतर्फी बाजी

पुण्यात सुरू असलेल्या ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती आणि गादी या दोन्ही विभागांत रोमांचक सामने झाले. सोलापूर आणि पुणे येथील मल्लांनी दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाउंडेशनने वाघोली येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र केसरी किताबाचे प्रमुख दावेदार असलेले महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षे, बाळू बोडके, पृथ्वीराज मोहोळ, हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील आणि सिकंदर शेख यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. माती विभागात सोलापूरच्या अनुभवी महेंद्र गायकवाडने विशाल बनकरला ६-१ गुणांनी नमवून विजयी सलामी दिली. तर नाशिकच्या बाळू बोडकेने कोल्हापूरच्या माऊली जमदाडेवर १०-५ गुणांनी सनसनाटी विजय मिळवला. याच विभागात हिंगोलीच्या सिकंदर शेखने पुणे जिल्ह्याच्या अनिकेत मांगडेचा ८-१ गुणांनी पराभव केला. अनिकेतने पहिला गुण मिळवला असला तरी, सिकंदरने सलग गुण मिळवत एकतर्फी विजय नोंदवला. गादी विभागात पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळने १० गुण मिळवत विजयी आगेकूच केली. दुसऱ्या लढतीत शिवराज राक्षेने प्रतीक जगतापला हरवले. प्रतीकने सुरुवातीला २ गुण मिळवले असले तरी, शिवराजने धारांग डाव टाकत १० गुणांची कमाई करत विजय मिळवला. सोलापूरच्या पृथ्वीराज पाटीलने पालघरच्या वैभव मानेचा ८-० असा एकतर्फी पराभव केला. तर गादी विभागातील आणखी एका महत्त्वाच्या लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बीडच्या प्रतीक देशमुखला १०-० गुणांनी पराभूत करत पुढील फेरीत स्थान निश्चित केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/NgoUCXZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.