शहरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील इयत्ता पाचवी ते सातवीतील ८ अल्पवयीन मुलांना गुंगीच्या गोळ्या देत त्यांच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वसतिगृहातील दहावीतील सात विधीसंघर्षित मुलांनी हा प्रकार केल्याने त्यांच्यासह वसतिगृह अधीक्षक सुशांत दूधसागरे यांना सर्व माहित असतानाही त्यांनी वेळेत पोलिसांना न कळवल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान विद्यार्थ्यांना वसतिगृह परिसरातून निर्जन ठिकाणी नेण्यात येत होते. त्यांना गुंगीच्या व भांगेच्या गोळ्या देऊन अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. भीतीपोटी गप्प राहिलेल्या काही मुलांनी अखेर हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले. या गोळ्या नेमक्या कुठून आणल्या गेल्या, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार घोटी व इगतपुरी शहरातील काही टपऱ्यांमधून त्या विकत घेतल्याची शक्यता आहे. याप्रकरणी जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील एका टपरी चालकाची चौकशी करण्यात आली असून तपास सुरू आहे. घटनेनंतर संतप्त पालकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली. त्यानंतर इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित जबाबदारांवर कडक कारवाई करावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. पीडित विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास या प्रकारामुळे पोटात व नैसर्गिक विधीच्या ठिकाणी त्रास होत असल्याचे संबंधित अत्याचार झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. पीडित मुलांना न्याय मिळावा माझ्या मुलावर अत्याचार झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. पीडित मुलांना न्याय मिळणे आवश्यक आहे. यामुळे असले विचित्र प्रकार घडणार नाहीत. - पीडित विद्यार्थ्यांचे पालक विधीसंघर्षित बालकांकडे पालकांमार्फत चौकशी सुरू विधीसंघर्षित सात बालकांच्या पालकांमार्फत त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. वसतिगृहातील अजून कोणी बेजबाबदारपणा केला असेल त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. - सारिका अहिरराव, पोलिस निरीक्षक, इगतपुरी योग्य ती कारवाई करणार वसतिगृहास बुधवारी सकाळी भेट देऊन माहिती घेण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. ती मुले वेगवेगळ्या वसतिगृहात पाठवता येवू शकतील का त्याबाबत निर्णय घेवू. - संजय शिंदे, प्रभारी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग सांगितल्यास मारण्याची धमकी दिवाळीपासून अत्याचार सुरू होता. वसतिगृहातील मुले मारहाण करत गुंगीच्या गोळ्या देऊन निर्जनस्थळी नेत अत्याचार करत. काही सांगितल्यास मारण्याची धमकी देत असे. यामुळे प्रचंड घाबरलो होतो. - पीडित विद्यार्थी पाच महिन्यांपासून अत्याचार वसतिगृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने त्याचा आश्रय घेत अनेक अनधिकृत प्रकार येथे सुरू आहेत. याच ठिकाणी दाट झाडी व वेलींमध्ये हा अत्याचार पाच महिन्यांपासून सुरू होता.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/TdkFsV4
इगतपुरीत वसतिगृहातील 8 अल्पवयीन मुलांना गुंगीच्या गोळ्या देऊन अनैसर्गिक अत्याचार:सात विधीसंघर्षित मुले तसेच पोलिसांना न कळवल्याने वसतिगृह अधीक्षकावरही गुन्हा
March 03, 2026
0