Type Here to Get Search Results !

हिंदूंची अतिक्रमणे काढली, इतरांची न काढल्यास मी बुलडाेझर आणेन- लांडगे:आमदारांनी दिला मढी येथे आयोजित सभेत थेट इशारा

मढी येथील अतिक्रमणे काढताना प्रशासनाने फक्त हिंदू समाजाचीच अतिक्रमणे काढली आहेत. या ठिकाणी जी इतर अतिक्रमणे आहेत, ती आठ दिवसांत काढून टाकावीत अन्यथा मी स्वतः बुलडोझर घेऊन येईल व अतिक्रमण काढून टाकेल, असा इशारा भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी दिला. मढी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप,आमदार मोनिका राजळे, सरपंच संजय मरकड, सागर बेग, अशोक महाराज पालवे, अमोल गर्जे आदींची उपस्थिती होती. आ.लांडगे म्हणाले, इराणमध्ये खामेनीची हत्या झाली तर भारतात सूतक पाळले जाते. त्यांच्या प्रार्थनास्थळासमोर हिंदूंना दुकाने लावू दिली जात नाही. मग आमच्याही मंदिरासमोर यांना आम्ही दुकाने लाऊ देणार नाही. आपल्यातीलच काही जण पैसे घेऊन आम्हाला ट्रोल करतात, मात्र ट्रोल करणाऱ्याच्या गावात किंवा घरात सुद्धा घुसायला हे कमी करणार नाहीत. सर्वधर्म समभाव आता संपला आहे. मढी देवस्थानच्या जागेवर वक्फ बोर्डाचे नाव कसे आले, याची महसूल विभागाने सखोल चौकशी करायला हवी. या विषयवार मी विधानसभेत आवाज उठवणार आहे. आता माझ्या सोबत दुर्गेचा अवतार असलेल्या आमदार राजळे सुद्धा आहेत. त्यांची अतिक्रमणे काढल्याने कायदा-सुव्यवस्था बिघडेल, याची भीती प्रशासनाने दाखवू नये. जे हिंदूंच्या देवस्थानांवर वक्फचा हक्क सांगतात त्यांच्या मतांची मला गरज नाही. आमदार नाही झालो तरी चालेल. राज्यात सध्या देवभाऊंचे सरकार आहे हे लक्षात घ्या. त्यांच्या मतांची आता गरज राहिली नाही : आ. जगताप यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, धर्मजागृतीसाठी आपल्यातील वाद बाजूला ठेवले पाहिजे. त्यांनी आम्हाला मते दिली तर ती आम्ही घेऊ, पण आता त्याचीही गरज नाही. मढीतील इतर अतिक्रमणे पाडण्यासाठी मी व लांडगे येणार आहोत. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आ. राजळे आम्हाला सांभाळून घेतील. जे कुंकू लावत नाहीत व आपला प्रसादही खात नाही त्यांना या ठिकाणी दुकाने लावू दिली जाणार नाहीत. त्यांच्यातील उच्चशिक्षित डॉक्टर-इंजिनिअर बॉम्बस्फोट करतात व आमचे रक्त सांडतात. हिंदू देवस्थानच्या जमिनींवर वक्फ बोर्डाचे नाव लावणाऱ्यांची खुमखुमी जिरवावी लागणार असल्याचे त्यांनी या वेळी संागितले. समाधी मंदिराची यात्रा म्हणजे भटक्यांची पंढरी श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ समाधी मंदिराची यात्रा म्हणजे भटक्यांची पंढरी मानली जाते.मात्र यंदाची ही यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मढी ग्रामपंचायतीने यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकानं लावण्यास बंदी घालण्याचा ठराव केल्यामुळे हा नवा वाद उफाळून आला आहे. गेल्या वर्षी देखील असाच ठराव करण्यात आला होता आणि यंदाही तो कायम असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.मढी ग्रामपंचायतीने मागील वर्षी एक विशेष ठराव मंजूर केला होता, ज्यामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना यात्रेत व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला होता. मुस्लीम व्यापाऱ्यांकडून मंदिराचे पावित्र्य राखले जात नाही, असा गंभीर आरोप करत हा निर्णय घेण्यात आला होता.हा मुद्दा न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/CIOXhl2

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.