Type Here to Get Search Results !

अजित पवारांचे नाव वापरण्यापूर्वी आता कुटुंबीयांची परवानगी आवश्यक:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पत्रानंतर धर्मादाय आयुक्तांकडून आदेश जारी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने स्मारके, उपक्रमांच्या घोषणा होवू लागल्या आहेत. पण आता त्याला मंगळवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिलेल्या पत्रामुळे चाप बसला आहे. त्यात व्यवसायिक किंवा वैयक्तीक स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा चुकीचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यात नमूद आहे. त्यामुळे अजित पवार यांचे नाव वापरण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची लेखी परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्तांनी यासंदर्भात राज्यातील सर्व कार्यालयांना आदेश जारी केले आहेत. गेल्या ३०-४० वर्षापासून अजित पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणारे सुनीलकुमार मुसळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ)म्हणून काम पाहत आहेत. पवारांच्या वतीने त्यांनी राज्याच्या धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठवून अजित पवारांच्या नावाचा स्वार्थासाठी वापर थांबवण्याची विनंती केली. उड्डाण पुलाला नाव दिले व लगेच वाद सुरू झाला पुण्यात विद्यापीठ चौकात बहुचर्चित डबल डेकर उड्डाण पुलाचे उदघाटन मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाले. या पुलाला स्व. अजित पवार यांचे नाव देण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र दुस-याच दिवशी भाजप नगरसेवक सनी निम्हण यांनी उड्डाण पुलाच्या कामातील दोष समोर आणल्याने चर्चा सुरु झाली होती.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/n1YhQTw

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.