Type Here to Get Search Results !

पत्नीच्या अब्रूचा बदला! खरातला ऑफिस बॉयने शिकवला धडा:ऑफिसमधील छुप्या कॅमेऱ्याने हायटेक हेरगिरी, याच व्हिडिओंमुळे खरातच्या कारनाम्यांचा पर्दाफाश

महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि फसवणूक प्रकरणातील संशयित अशोक खरात याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरालगत पार पडलेल्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत राज्यातील दिग्गज राजकीय नेत्यांची नावे ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून छापण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरातच्या मुलीचा विवाह सोहळा १० जानेवारी २०२६ रोजी नाशिकमधील रिसॉर्टवर पार पडला. या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि आमदार दीपक केसरकर यांची नावे झळकली आहेत. आयटीसह सीजीएसटी, ईडीकडून खरात प्रकरणाची स्वतंत्र चौकशी खरात याच्यासह त्याच्या कुटुंबीयांच्या नावे नाशिकसह पुणे, रायगड, अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायात त्याने जीएसटी देखील बुडवला असल्याचा संशय आहे. त्या दिशेनेदेखील केंद्र व राज्य जीएसटी पथकाकडून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोन्ही यंत्रणांपाठोपाठ ईडीनेही संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. पुढे काय? - फौजदारी कारवाईसह अटकेची शक्यता आयकर व सेंट्रल जीएसटीतील कायदेशीर तरतुदींनुसार, करचुकवेगिरी सिद्ध झाल्यास खरात व कुटुंबीयांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल होऊन तीन वर्षांपासून ते १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व २०० टक्क्यांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे निवृत्त आयकर अधिकाऱ्याने सांगितले. आधी ऑफिसबॉयविरुद्ध तक्रार, नंतर खरातच अडकला २९ डिसेंबर २०२५ रोजी वावी पोलिस ठाण्यात खरातने खंडणीची तक्रार दिली होती. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी पोलिस ठाण्यात ऑफिस बॉयविरोधात ब्लॅकमेलिंग आणि अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १७ मार्च २०२६ रोजी सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरातविरोधात गुन्हा दाखल झाला. स्पाय कॅमेऱ्याची बाब ऑफिस बॉयच्या मित्रालाही माहिती खरात बसत असलेल्या खुर्चीच्या मागील बाजुच्या कोपऱ्याजवळ मित्राच्या मदतीने त्याने बारीक स्पाय कॅमेरा लावला. २०२३ ते २०२५ या कालावधीतील सर्व ‘ॲक्सेस’ त्याने मोबाइलमध्ये घेतला. खरात महिलांना काहीतरी खाण्यास-पिण्यास देत असे आणि डोक्यावर ग्लास ठेवण्यास सांगून पाठीमागून मिठी मारत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना दिसला. भीतीपोटी सुरुवातीला कोणी तक्रार दिली नाही. शिर्डीमध्ये एका तरुणीने तक्रार दिल्यानंतर खरातने संबंधित तरुणाकडे व्हिडिओ मागितले; पत्नी व मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. पण त्याने पेनड्राइव्हमध्ये व्हिडिओ जतन केले. २०० कोटी रुपयांची संपत्ती, मात्र कागदावर १२ लाखांचे उत्पन्न भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या पापाचा घडा आता भरत चालला आहे. पोलीस तपासानंतर आता खरातच्या आर्थिक साम्राज्याची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. नाशिकसह राज्यभरात खरातची तब्बल २०० कोटींहून अधिकची मालमत्ता असल्याचे समोर येत असताना त्याने आयकर विभागाला सादर केलेल्या आयटीआरमध्ये स्वतःचे उत्पन्न केवळ १२ लाख रुपयेच दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे खरातच्या या मंत्रतंत्राच्या विळख्यात खुद्द याच आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारीदेखील ‘आंधळे’ होऊन नियमित दरबारात हजेरी लावत होते. त्यांच्याच मदतीने त्याने शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. राजकीय वरदहस्ताची चर्चा एकीकडे कॅप्टन खरात यांच्यावर महिलांचे लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप असताना, दुसरीकडे त्यांच्या घरच्या कार्यक्रमात राज्याच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या नेत्यांची नावे असणे, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भोंदू खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत एकनाथ शिंदेंचे नाव खरातच्या ‘ओकस’ कार्यालयातील बंद दरवाजाआड सुरू असलेल्या काळ्या कारनाम्याला ऑफिस बॉयनेच तांत्रिक सुरुंग लावला. आपल्याच पत्नीवर खरातने अत्याचार केल्याचे कळताच बदला घेण्यासाठी त्याने खरातच्या कार्यालयात छुपे कॅमेरे बसवून खरातचे बिंग फोडले. याच कॅमेऱ्यातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची शहर पोलिसांनी दखल घेत अत्यंत गोपनीय ऑपरेशन राबवून या भोंदूला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. ऑफिस बॉयने कॅमेरा लावत कसा भंडाफोड केला याचा हा ‘ग्राउंड रिपोर्ट’. ओकस कार्यालयात अनेक महिलांचे मन आणि शरीर शुद्ध करण्याच्या नावाखाली खरात शोषण करायचा. त्याच्या भक्तांमध्ये अनेक बडे राजकारणी, पोलिस अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणीही त्याच्याविरोधात तोंड उघडत नव्हते. सूड घेण्यासाठी हेरगिरी संबंधित ऑफिस बॉय २०१९ पासून खरातकडे ८ हजार रुपये महिना पगारावर कामाला होता. खरात अंकशास्त्र, मंत्र-तंत्र व भविष्य सांगत असल्याने तिथे शेकडो भक्तांची रेलचेल असे. अपॉइंटमेंट देणे, बोटांच्या अंगठीचे माप घेणे, खडे आणणे, ऑफिस उघडणे-बंद करणे, साफसफाई अशी कामे तो करायचा. खरात या पती-पत्नीला बोलावून घेत असे आणि पतीला बाहेर पाठवून आत विधी करत असे. २०२३ मध्ये ऑफिस बॉय गरोदर पत्नीला आशीर्वाद घेण्याकरिता खरातकडे घेऊन आला होता. बाळासाठी विधी करण्याचे सांगून खरातने त्याच्या पत्नीवर अत्याचार केला. ही बाब सांगितल्यावर ऑफिस बॉयला विश्वास बसेना, म्हणून पत्नीने पोटातील बाळाची शपथ घेतली. तेव्हा त्याने ‘बाबा’ला धडा शिकवण्याचे ठरवले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/YP2cf50

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.