Type Here to Get Search Results !

तटकरे-पटेल यांच्या स्पष्टीकरणाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असमाधानी:सुनेत्रा पवार आज दिल्ली दरबारी; अमित शाह यांच्या भेटीकडे लक्ष

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नेतृत्वावरून आणि अधिकारावरून राजकीय युद्ध सुरू झाल्याचे दिसते. पक्षाच्या घटनेत बदल करून सर्व अधिकार कार्याध्यक्षांकडे घेण्याचा प्रयत्न सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केल्याने पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणावर तटकरे आणि पटेल यांनी दिलेले स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी फेटाळून लावले असून, त्या या उत्तराने समाधानी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार गुरुवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. या पत्रात पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. अध्यक्षांसोबतच कार्याध्यक्षांनाही सर्व निर्णय घेण्याचे समान अधिकार द्यावेत, अशी खेळी त्यांनी केली. मात्र, ही बाब लक्षात येताच सुनेत्रा पवार यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून तटकरे-पटेल यांचा सर्व पत्रव्यवहार रद्द करण्याचे सांगितले. पक्षावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे काही सुरू आहे, तो केवळ प्रशासकीय बदल नसून पक्षावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. तटकरे आणि पटेल यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद केवळ नावापुरते ठेवण्याचा हा प्रयत्न होता का, असा सवाल आता राजकीय विश्लेषक विचारत आहेत. या वादामुळे महायुतीमधील या गटाची शक्ती कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/0TSEahL

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.