Type Here to Get Search Results !

संभाजीनगरच्या मनपा आयुक्तांसह 10 जिल्हाधिकारी, 7 आयुक्तांच्या बदल्या:संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी गौडा, मनपा आयुक्तपदी अमोल येडगे

राज्य सरकारने प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात १० जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व ७ महापालिका व विभाग आयुक्तांचा समावेश आहे. या मोठ्या फेरबदलात छत्रपती संभाजीनगर शहरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, शहराचे संपूर्ण प्रशासकीय नेतृत्व बदलले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी आता विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर महानगरपालिका आयुक्त म्हणून अमोल येडगे कार्यभार स्वीकारतील. यापूर्वीचे आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली नवी मुंबईत “जलजीवन मिशन'च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे, तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची अकोला येथे बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे.या बदल्यांमुळे कोल्हापूर, लातूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील प्रशासकीय समीकरणेही बदलली आहेत. स्थानिक प्रशासनात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी हे फेरबदल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. नवीन नियुक्ती झालेले अधिकारी लवकरच आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. मुंबई | राज्य सरकारने प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी गुरुवारी सनदी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/UqhRPad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.