शहरातील शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास राजू राजे यांच्या शेतातील विहिरीत कार (एमएच १५ जेएस १०५३) अनियंत्रित होऊन कोसळली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृत दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे असून त्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. उर्वरित ४ जणांची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. विहिरीत पाणी आणि अधिक चिखल आणि अंधार असल्याने कार बाहेर काढण्यास अडचणींचा सामना करावा लागला. अखेर क्रेन आणि हायड्रा मशीनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JRqjigU
दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून नऊ ठार:मध्यरात्री काढले मृतदेह, एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश
April 03, 2026
0