पाच वर्षांपासूनचा जमिनीचा वाद संपुष्टात आणण्यासाठी अल्पवयीन पुतण्याने ऑनलाइन शस्त्र खरेदी करीत बाप-लेकाची हत्या केल्याची घटना शहरातील महिलाश्रम परिसरातील हनुमान मंदिराजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले अाहे. मृतांमध्ये रितेश प्रभाकर भलमे (२५) व प्रभाकर फुलचंद भलमे (५४), रा. बरबडी) यांचा समावेश आहे. म्हसाळा येथील गजानन वालके यांच्या कुटुंबातील लग्न समारंभासाठी प्रभाकर भलमे हे मुलगा रितेशसह नातेवाइकांसोबत गेले होते. वायगाव (नि.) येथे विवाह सोहळा झाल्यानंतर सर्वजण रात्री उशिरा वर्ध्यात परतले. महिलाश्रमाजवळील हनुमान मंदिराजवळ प्रभाकर व रितेश ट्रॅव्हल्समधून उतरताच आधीपासून दबा धरून बसलेल्या १७ वर्षीय पुतण्याने रितेशवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या वेळी प्रभाकर मुलाला वाचवण्यासाठी धावले असता आरोपीने त्यांच्यावरही सपासप वार केले. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. काही दिवसांपूर्वी ऑनलाइन चाकू खरेदीची कबुली आराेपीने दिली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/tFgiXGE
ऑनलाइन चाकू खरेदी करत अल्पवयीन मुलाकडून काका-चुलत भावाची हत्या:वर्ध्यात जमिनीच्या वादातून घडली घटना, संशयित ताब्यात
April 05, 2026
0