Type Here to Get Search Results !

39 आमदारांच्या राजीनाम्यासाठी ‘सीटू’ची निदर्शने:भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून अमरावतीत आंदोलन

महिलांच्या इभ्रतीवर हात घालणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाईची मागणी करत, त्याच्या संपर्कातील ३९ आमदारांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी कलेक्ट्रेटवर आंदोलन करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कामगार संघटना ‘सीटू’ आणि जनवादी महिला फेडरेशनच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. सध्या राज्यात भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक राजकीय पुढारी गुंतले असून, राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. खरातची अनेक प्रकरणे समोर येत असून, दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. ‘सीटू’च्या मते, या प्रकरणात राज्यातील ३९ आमदार गुंतले आहेत. त्यामुळे सरकारने या सर्व आमदारांचे राजीनामे घेतले पाहिजेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शकांनी तीव्र घोषणाबाजीही केली. या आंदोलनात ‘सीटू’चे सुभाष पांडे, रमेश सोनुले, राजेंद्र भांबोरे, संध्या खांडेकर, पंजाबराव शिंदे, तसेच जनवादी महिला संघटनेच्या वहिदा कलाम, पद्माताई गजभिये, चित्राताई बोरकर, चंदाताई वानखडे, नीलू मेश्राम, मालती मोहोड, मनीषा गोरे, सुनीता भोवते, रेखा वानखडे, रेहाना खान, शमा परविन, अरुणा मालविय, वंदना बुरांडे, किरण रंगारी, वैशाली नेवारे, निता मेश्राम, ममता काळे, संगीता वानखडे, मुकूंद काळे, प्रभाकर आकोटकर आदी सहभागी झाले होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Tba1NBg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.