Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित:महावितरणकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी निर्णय

महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी (25 एप्रिल) मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची घोषणा केली आहे. ही कामे अत्यावश्यक असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे विविध भागांत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद करून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. याचा उद्देश पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सुस्थितीत ठेवणे हा आहे. शनिवारी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत औरंगपुरा, समर्थनगर, टिळकपथ, गुलमंडी, दलालवाडी, पैठणगेट, तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, नागेश्वरवाडी, प्रणव प्लाझा, धनमंडी, कुंभारवाडा, वरद गणेश मंदिर रोड, चिंतामणी कॉलनी, अदालत रोड, क्रांती चौक पोलिस स्टेशन परिसर, बस स्टँड परिसर, पोलिस आयुक्त कार्यालय परिसर, भडकलगेट, मिल कॉर्नर, भोईवाडा, खडकेश्वर, नारळीबाग, गरमपाणी, घाटी परिसर, बाबा पेट्रोल पंप, म्हाडा कॉलनी, अदालत रोड, एबीसी कॉम्प्लेक्स आणि एलआयसी कार्यालय परिसरातील वीजपुरवठा बंद राहील. तसेच, सकाळी 9 ते दुपारी 11 वाजेपर्यंत सुतगिरणी उपकेंद्रावरील इंद्रानगर, स्टेडियम, गजानन महाराज मंदिर परिसर, मुथा कॉम्प्लेक्स परिसर आणि चाणक्यपुरी या भागांत वीजपुरवठा खंडित होईल. याव्यतिरिक्त, सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत उस्मानपुरा, एसबीएच कॉलनी आणि विकासनगर परिसरात वीज बंद राहील. सकाळी 8.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पैठणगेट, सिल्लेखाना, अजबनगर आणि समतानगर या परिसरातही वीजपुरवठा खंडित केला जाईल. कामाच्या नियोजनानुसार, वीजपुरवठा दिलेल्या वेळेपूर्वी किंवा वेळेनंतर पूर्ववत होऊ शकतो, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/1Quzi20

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.