अहंकार शिगेला पोहोचलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘भारत म्हणजे नरकाचा खड्डा’ असे वक्तव्य गुरुवारी (२३ एप्रिल) केले होते. त्याला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चोख उत्तर तर दिलेच, पण गेल्या ५५ दिवसांपासून अमेरिकेशी युद्धात जबरदस्त झुंज देत ट्रम्प यांना हतबल करणाऱ्या इराणने भारताच्या वतीने तडाखेबंद प्रतिहल्ला केला आहे. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने एक पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली आहे. ती सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात भारत देशाविषयी ट्रम्प यांचे विधान किती मूर्खपणाचे आहे हे सांगण्यासाठी भारतातील संपन्नतेचे दर्शन या व्हिडिओत दाखवले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणेशोत्सव आणि मुंबई नगरी अशा रुपात महाराष्ट्र राज्याची संपन्नता या व्हिडिओत दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा अहंकार पुरता ठेचून काढला आहे. यातून भारत आणि इराणचे मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. शिवाय महाराष्ट्र हे संपन्न राज्य असल्याचा डंका पुन्हा एकदा जगभर वाजला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/a9qwpIm
इराणने महाराष्ट्राच्या संपन्नतेचा व्हिडिओ पोस्ट केला:भारताला नरकाचा खड्डा म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अहंकार इराणी दूतावासाने ठेचून टाकला
April 24, 2026
0