उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर सोमवारी कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक आलेल्या धुळीच्या वादळात सापडले. ते महालक्ष्मी रेसकोर्सवरून मुरबाडकडे ते ओएसडींसह एका विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. मात्र, खराब हवामान व ‘झीरो व्हिजिबिलिटी’मुळे त्यांचे हेलिकॉप्टर तब्बल २० मिनिटे हवेत हेलकावे होते. अखेर वैमानिकाने प्रसंगावधान राखून ‘एटीसी’ शी संपर्क साधला आणि तातडीने मार्ग बदलून हेलिकॉप्टर जुहू विमानतळावर सुरक्षित उतरवले. वैमानिकाच्या या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. धुळीमुळे वैमानिकाला समोरचे दिसत नव्हते : सूत्रांनुसार, चॉपरने उड्डाण केले तेव्हा हवामान स्वच्छ होते. मात्र, ठाणे-कल्याण जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचताच वाऱ्याचा वेग ताशी ६०-७० किमीपर्यंत पोहोचला. धुळीमुळे वैमानिकाला समोरचे दिसेनासे झाले होते. हेलिकॉप्टर हेलकावे खात असताना वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. त्या वेळी मार्ग बदलण्याची सूचना दिली होती. मराठवाड्यात पाऊस, २ दिवस ‘यलो अलर्ट’ राज्यातील बहुतांश भागात गुरुवारी ढगाळ वातावरण राहिले. तर छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नांदेड, हिंगोली, बीड, नाशिक जिल्ह्यासह विदर्भातील काही भागात हलक्या ते वादळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने, शनिवारपर्यंत (९ मे) १६ जिल्ह्यांसाठी दमट हवामानासह वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. बाष्पयुक्त वारे, पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे पाऊस-गारपीट अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे, प्रखर उष्णतेमुळे ही आर्द्रता वेगाने वर जाऊन ढगांची होणारी निर्मिती, तसेच, नवीन पश्चिमी विक्षोभाच्या आगामी २-३ दिवस पावसाची स्थिती कायम राहील. श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RQg3fyU
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकाॅप्टरचे वादळामुळे जुहूत इमर्जन्सी लँडिंग:हवेत 20 मिनिटे हेलकाव्यानंतर वैमानिकाचे प्रसंगावधान
May 07, 2026
0